(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Technology : LinkedIn कडून प्रोफेशनल्ससाठी मुंबईतील टॉप इमर्जिंग रोजगारांची यादी शेअर
Technology News : मुंबईतील ८७ टक्के प्रोफेशनल्स २०२४ मध्ये रोजगार बदलण्याचे नियोजन करत आहेत
Technology News : भारताची व्यावसायिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईमधील प्रोफेशनल्स आर्थिक अनिश्चितता असताना देखील करिअरच्या दिशेने धाडसी पाऊल उचलण्यास उत्सुक आहेत. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइनच्या (Linkedin) नुकत्याच झालेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, मुंबईतील 10 पैकी जवळपास 9 (87 टक्के) प्रोफेक्शनल्स 2024 मध्ये नवीन रोजगाराचा विचार करतायत.
AI मुळे कौशल्य परिवर्तनाला गती मिळत असताना लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की, भारतात रोजगारांसाठी आवश्यक कौशल्यांमध्ये 2015 पासून 30 टक्क्यांनी बदल झाला आहे. 20230 पर्यंत या कौशल्यांमध्ये जागतिक स्तरावर 65 टक्क्यांनी बदल होण्याची अपेक्षा आहे. या परिवर्तनादरम्यान रोजगार शोधणं आव्हानात्मक ठरू शकते. पण, मुंबईतील प्रोफेशनल्स निश्चयी आहेत. इतरांपेक्षा वरचढ ठरण्यासाठी शहरातील 79 टक्के प्रोफेशनल्स त्यांच्या रोजगार शोधामध्ये यशस्वी होण्याकरिता नवीन मार्गांचा प्रयत्न करत आहेत. 86 टक्के प्रोफेशनल्स लिंक्डइनवर अधिक कन्टेन्ट पोस्ट करत वैयक्तिक ब्रॅण्डिंगला प्राधान्य देत आहेत, तर 90 टक्के प्रोफेशनल्स नवीन कौशल्ये संपादित करण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस/लर्निंगवर अधिक वेळ व्यतित करत आहेत. ते एआयचा वापर करण्यास देखील उत्सुक आहेत, जेथे 83 टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, त्यामुळे त्यांना अधिक कार्यक्षमपणे आणि उत्पादकतेसह रोजगार शोधण्यास मदत होऊ शकते.
प्रोफेशनल्सला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लिंक्डइनने मुंबईतील जॉब्स ऑन द राइजची यादी सादर केली आहे:
1. क्लोजिंग मॅनेजर
2. क्लायण्ट अॅडवायजर
3. सस्टेनेबिलिटी मॅनेजर
4. मेडिकल टेक्निशियन
5. सेल्स डेव्हलपमेंट रिप्रीझेन्टेटिव्ह
6. सोर्सिंग मॅनेजर
7. रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टण्ट
8. फायनान्शियल प्लानिंग अॅनालिस्ट
9. ग्रोथ मॅनेजर
10. इन्व्हेस्टमेंट बँकर
या वर्षात भारतातील 95 टक्के रिक्रूटर्स नवीन टॅलेंटचे स्वागत करण्याचे नियोजन करत असताना लिंक्डइनची त्यांना योग्य उमेदवार शोधण्यास मदत करण्याची आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाला भावी कौशल्यांसह सुसज्ज करण्याची इच्छा आहे. या संदर्भात लिंक्डइनने नवीन जनरेटिव्ह एआय टूल्सचा प्रयोग केला आहे.
रिक्रूटर 2024 :
लिंक्डइनचे नवीन एआय-असिस्टेड रिक्रूटिंग अनुभव हायरिंग अधिक कार्यक्षम आणि सुलभ करते, ज्यामुळे टॅलेंट प्रमुख धोरणात्मक, कर्मचारी-केंद्रित कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. हायरर्स साध्या भाषेतील सर्च प्रॉम्प्ट्स जसे 'मला सीनियर ग्रोथ मार्केटिंग लीडरला नियुक्त करायचे आहे' आणि लिंक्डइनचे एआय मॉडेल्स यांचा वापर करू शकतात. लिंक्डइनवरील 1 बिलियनहून अधिक प्रोफेशनल्सकडून अनोखी माहिती, 67.1 दशलक्ष कंपन्या आणि 41,000 कौशल्ये यामधून हायरर कोणत्या प्रकारच्या उमेदवाराचा शोध घेत आहे याची माहिती मिळू शकते, तसेच उमेदवारांच्या व्यापक समूहामधून उच्च दर्जाच्या उमेदवारांच्या शिफारसी मिळू शकतात.
लिंक्डइन लर्निंगचे एआय-समर्थित कोचिंग :
लिंक्डइन सर्व प्रकारच्या रोजगारांसाठी आवश्यक आणि मागणीमध्ये असलेली दोन कौशल्ये : नेतृत्व आणि व्यवस्थापन या संदर्भात रिअल-टाईम सल्ला देत आहे. लर्नर्स प्रश्न विचारू शकतात जसे 'मी प्रभावीपणे टास्क्स आणि जबाबदाऱ्या कशा प्रकारे सोपवू शकतो?' यासाठी वन-साईज-फिट्स-ऑल उत्तर देण्याऐवजी ते तुम्हाला तुमची विशिष्ट स्थिती आणि अनुभव अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी प्रश्नाचे स्पष्टीकरण विचारेल.