Mobile : काय सांगता ! मानवी शरीरातील उष्णतेने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स होणार चार्ज; IIT मंडीतील संशोधनातून स्पष्ट
Mobile : आयआयटी मंडीच्या संशोधकांसह थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूल विकसित करण्यात आलं आहे. हे मॉड्यूल मानवी स्पर्शानेच चार्जिंग सुरु करू शकेल.

Mobile : अनेकदा कामाच्या घाईगडबडीत बाहेर फिरायला जाताना किंवा ऑफिसला जाताना मोबाईल (Mobile), लॅपटॉप चार्ज करणं आपण विसरून जातो किंवा राहून जातं. अशा वेळी मोबाईलची बॅटरी डेड होणं, लॅपटॉप (Laptop) स्लो होणं यांसारख्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. पण, आता चिंता करण्याची काही गरज नाही. तसेच, सतत यासाठी लागणारं चार्जर (Charger) आणि पॉवर बॅंकसुद्धा बरोबर ठेवण्याची गरज नाही. कारण, आता तुमचा मोबाईल, इयरफोन, लॅपटॉप यांसारखे गॅजेट्स आता अगदी सहज चार्ज करता येऊ शकतात.
नुकतंच, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मंडीच्या संशोधकांसह सहयोगी प्रा. अजय सोनी यांच्या नेतृत्वाखाली थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूल विकसित करण्यात आलं आहे. हे मॉड्यूल मानवी स्पर्शानेच चार्जिंग सुरु करू शकेल. याच्या मदतीने कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटची बॅटरी अगदी सहज चार्ज करता येऊ शकते. अशी कमी ऊर्जा वापरणारी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स केवळ तुमच्या शरीरातील उष्णता चार्ज केली जाऊ शकतात.
थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूलची किंमत किती?
हे संशोधन जर्मन केमिकल सोसायटीच्या जर्नल अँजेवांडटे केमीमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूलची किंमत 200 ते 500 रुपयांदरम्यान असेल. माणसाला ते घड्याळाच्या पट्ट्याप्रमाणे त्याच्या मनगटावर घालावे लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या डिव्हाईसला चार्ज करण्यासाठी मानवी शरीराच्या ऊर्जेशिवाय इतर कोणत्याही साधनाची गरज भासणार नाही.
थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूलसह इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट चार्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वायरची गरज भासणार नाही. गॅझेटमध्ये एक लहान डिव्हाईस सेट केलेलं असणार आहे. तसेच, हे मॉड्यूल हात, मांडीवर किंवा खिशात धरल्यावर थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूलद्वारे गॅझेट चार्ज करता येऊ शकतात.
सिल्व्हर टेल्युराइड नॅनोवायरपासून बनवलेले मॉड्यूल
आयआयटी मंडीतील संशोधकांनी सिल्व्हर टेल्युराइड नॅनोवायरपासून थर्मोइलेक्ट्रिक मॉड्यूल तयार केलं आहे. पॉलीविनाइलिडीन फ्लोराईड झिल्ली थर्मल स्थिरता, रासायनिक प्रतिकार आणि उत्कृष्ट यांत्रिक शक्तीद्वारे दर्शविले जाते. सिल्व्हर टेल्युराईड नॅनोवायर मानवी शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे म्हणजेच उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करण्याचे काम करेल. या तंत्रज्ञानामुळे विजेची बचतही होणार आहे. लोकांना पॉवर बँक घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तसेच चार्जर आणि पॉवर बँकच्या वापराने तुम्हाला चिंताही करण्याची गरज भासणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :























