एक्स्प्लोर

UPI Scam : सावधान! तुमच्या फोनवर चुकून कोणी पैसे पाठवले असतील तर खूश होऊ नका; मोठी फसवणूक होण्याची शक्यता

UPI Scam : एकदा पैसे पाठवल्यानंतर फसवणूक करणारे हे लोक पैशांची मागणी करू लागतात. आपल्या बोलण्यात गुंतवून किंवा जाळ्यात अडकवून हे लोक तुमच्या बॅंकेची माहिती आणि ओटीपी चोरतात.

UPI Scam : ऑनलाईन घोटाळ्यामुळे जगभरात लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ऑनलाईन घोटाळ्यांमुळे (Online Scam) अनेकजण हैराण झाले आहेत. तर, फसवणूक करणारे दिवसेंदिवस लोकांची फसवणूक करण्याचे मार्ग शोधत असतात. अशातच, जर कधी तुमच्या अकाऊंटमध्ये जर चुकून पैसे आले तर खुश होण्याची गरज नाही. कारण, ही फसवणूक करणाऱ्यांची नवीन युक्ती असू शकते. 

अनेकदा आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये फुकटचे पैसे आले की ते पाहून आपल्याला आनंद होतो. या आनंदात आपण इतके मग्न होतो की हे पैसे आपल्याला कुठून आले, कसे आले याचा देखील आपल्याला विसर पडतो. पण, खरंतर हीच खरी स्कॅमची सुरुवात असते. 

एकदा पैसे पाठवल्यानंतर फसवणूक करणारे हे लोक पैशांची मागणी करू लागतात. आपल्या बोलण्यात गुंतवून किंवा जाळ्यात अडकवून हे लोक तुमच्या बॅंकेची माहिती आणि ओटीपी चोरतात. कळत नकळत बॅंकिंग डिटेल्स देण्याची आपण जी चूक करतो ही चूक पुढे आपल्यालाच महागात पडू शकते. तुमच्या याच चुकीमुळे स्कॅम करणारे या संधीचा फायदा उचलतात. 

मालवेअरचासुद्धा मोठा धोका 

घोटाळे करणारे लोक आपलं जाळं अशा प्रकारे तयार करतात की इच्छा नसतानाही आपण त्यांच्या बोलण्यात अडकत जातो. आणि बॅंकिंग डिटेल्स आणि ओटीपी सारखी महत्त्वाची माहिती शेअर करतो. लोकांचे यूपीआय लॉग इन (UPI Log In), पेमेंट डिटेल्स चोरण्यासाठी मालवेअरचासुद्धा मोठा हातभार आहे. 

अशा वेळी तुम्हाला सल्ला दिला जातो की, जर कोणी अनोळखी व्यक्ती एखाद्या लिंकला जर तुमच्याशी शेअर करत असेल तर चुकूनही ती लिंक ओपन करू नका. कारण त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस होण्याची शक्यता आहे. कारण या माध्यमातून तुमच्या बॅंकेशी संबंधित माहिती चोरून तुमचं खातं रिकामं करण्याची शक्यता आहे. 

UPI Scam पासून वाचण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स 

  • चुकूनही UPI PIN , ओटीपी किंवा पासवर्ड चुकूनही कोणाला शेअर करण्याची चूक करू नका. 
  • जर कोणी अनोळखी व्यक्ती कोणत्याही लिंकवर किंवा वेबसाईटवर क्लिक करून कोणत्याही वेबसाईटची माहिती भरण्यास सांगत असे तर सर्वात URL बरोबर आहे का हे आधी तपासा. 
  • UPI अॅपला अपडेट करा आणि अॅपसाठी चांगला पासवर्ड सेट करा. 
  • सार्वजनिक Wifi चा वापर UPI ची देवाण-घेवाण करण्यासाठी करू नका. 

महत्त्वाच्या बातम्या :

Aadhar Online Payment : आधारद्वारे ऑनलाईन पेमेंटचे नवे नियम लवकरच लागू होणार, काय होणार फायदे? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget