Samsung Galaxy S24 Ultra: 'या' नवीन स्मार्टफोनची भारतात रेकॉर्डब्रेक बुकिंग; तीन दिवसांत 2.5 लाख पेक्षा जास्त फोनची प्री- बुकिंग!
सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोन ने भारतात बनवले आहे अनोखे रेकॉर्ड, सेल सुरू व्हायच्या अगोदरच 2.5 लाख पेक्षा जास्त फोनची बुकिंग झाली.
Samsung Galaxy S24 Ultra : Samsung Galaxy S24 Ultra हा (Samsung ) फोन 17 जानेवारीला लॉंच करण्यात आला. या फोनची विक्री सुरु होण्याआधीच नवा रेकॉर्ड सेट केला आहे. एक दोन नाही तर तब्बल 2.5 लाख युनिट्स पेक्षा जास्त प्री-बुकिंग झाली आहे. त्यामुळे अनेक लोक आता सॅमसंगला पसंती देताना दिसत आहे. हा फोन आयफोनला टक्करल देणार का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
17 जानेवारीला सॅमसंगने त्याचा वार्षिक गॅलॅक्सी अनकॅप्ड इवेंट आयोजित केला होता. ज्यामध्ये कंपनीने तिचे ३ स्मार्टफोन लाँच केलेत. या फोनचे नाव Samaung Galaxy S24 , Samsung Galaxy S24 plus आणि Samsung Galaxy S24 Ultra आहेत. कंपनीने तिच्या 3 फोनची विक्री 31 जानेवारी पासून सुरू केली करणार असे सांगितले होते. मात्र प्री-बुकिंगची सुरूवात 18 जानेवारीपासून सुरू करण्यात आली. भारतीय युजर्समध्ये या फोन बद्दल येवढी क्रेज दिसून आली कि फक्त 3 दिवसाच्या आत या फोनची 2.5 लाख युनिट्स पेक्षा जास्त प्री-बुकिंग झाली.
सॅमसंग फोनने बनवले नवीन रेकॉर्ड -
सॅमसंगने त्याच्या नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोनला Galaxy AI फिचर सोबत लॉंच केलं होतं. या फिचर मुळे अनेक युजर्सना सॅमसंगच्या नवीन फोन मधील AI म्हणजेच Artificial Intelligence टेक्नॉलॉजीच्या मदतीने खूप चांगल्या सुविधा मिळतात. सॅमसंगच्या या नवीन फिचरने युजर्सना भरपूर आकर्षित केलं आणि लोकांची मनं जिंकली आहे.
याशिवाय सॅमसंगने त्याच्या नवीन सिरीजच्या फोनचे प्री बुकिंग करणाऱ्यांसाठी अनेक ऑफर्स असतील असे सांगितले आहे. सॅमसंग गॅलॅक्सी S24 plus आणि सॅमसंग गॅलॅक्सी S24 altra ला बुक केल्यावर युजर्सना 22,000 रुपयांचा फायदा होऊ शकतो. तसेच सॅमसंग गॅलॅक्सी S24 ला बुक केल्यावर युजर्सना साधारण 15,000 रूपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
नवीन फोन सिरीजची किंमत -
Samsung Galaxy S24 ची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये युजर्सना 8GB + 256GB व्हेरिएंट मिळेल. याशिवाय, या सीरीजच्या दुसऱ्या मॉडेलची म्हणजेच Samsung Galaxy S24 Plus ची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये आहे, ज्यामध्ये यूजर्सना 12GB + 256GB व्हेरिएंट मिळेल.
'हे' आहेत काही नवीन फीचर्स
सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल प्रत्येकजण उत्सुक आहे. दरम्यान, काही नवीन फिचर्स समोर आले आहेत. कोरियन कंपनी असलेल्या सॅमसंग जानेवारीमध्ये Galaxy S24 सीरीज लॉंच करणार आहे. या सिरीज अंतर्गत 3 स्मार्टफोन लॉन्च केले जातील, त्यापैकी सर्वात खास Samsung Galaxy S24 Ultra असेल. मागील फोनप्रमाणे या मोबाईल फोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. मात्र, यावेळी या सिरीजमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे कारण यामध्ये Qualcomm ची नवीन चिप दिली जात आहे. दरम्यान, Galaxy S24 Ultra बाबत काही नवीन लीक्स समोर आले आहेत. Galaxy S23 ची कॅमेरा क्वालिटी चांगली असूनही फोटो कधीकधी ओव्हर सॅच्युरेटेड झाल्यामुळे आपल्याला फोटोंमधील रंग मूळ दिसत नाहीत. Galaxy S24 Ultra मध्ये ही समस्या दूर करण्यात आली आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगलं सॅचुरेशन आणि शार्पनेस मिळेल.
इतर महत्वाची बातमी-
Share Market : शेअर बाजार आपटला, Sensex 1053 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपये पाण्यात