Offline Google Map Save : सुट्यांमध्ये फिरायला जाताय? नेटवर्क नसल्याने रस्ता चुकू शकता, आताच या स्टेप्स वापरुन Offline Google Map सेव्ह करा!
गुगल मॅप्सच्या माध्यमातून स्मार्टफोन युजर्सना ऑफलाइन मॅप्स सेव्ह करण्याची सुविधा मिळते. जर तुम्हीही मार्गांच्या माहितीसाठी गुगल मॅपचा वापर करत असाल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते.
Offline Google Map Save : सध्या ख्रिसमसमुळे आणि नवीन वर्षामुळे अनेकांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात जाण्याचा प्लॅन असतो. अनेकांना नव्या ठिकाणी जाताना रस्ता माहित नसतो. त्यामुळे आपण गुगल मॅपचा वापर करतो मात्र प्रवासात अनेकदा आपल्याला नेटवर्क प्रॉब्लेम येतच असतो. त्यामुळे आपल्याला आपला गुगल मॅप सतत रिसेट करावा लागतो किंवा नेटवर्क नसल्याने आणि रस्ता माहित नसल्याने अनेकदा अनोळखी ठिकाणी आपला रस्ता चुकतो. त्यावेळी अनेक स्थानिकांना विचारत आपण मार्ग काढतो. मात्र अनेकदा स्थानिकांना किंवा अनोळखी व्यक्तींना पत्ता विचारणं धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला यावरचं एका सोपा फंडा सांगणार आहोत.
गुगल मॅप्सच्या माध्यमातून स्मार्टफोन युजर्सना ऑफलाइन मॅप्स सेव्ह करण्याची सुविधा मिळते. जर तुम्हीही मार्गांच्या माहितीसाठी गुगल मॅपचा वापर करत असाल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते. वास्तविक, वापरकर्त्याच्या सोयीची विशेष काळजी घेत गुगल मॅप्समध्ये ऑफलाइन मॅप्स फीचर सादर करण्यात आले आहे. या फीचरमुळे गुगल मॅप्स इंटरनेटशी कनेक्ट नसतानाही वापरता येणार आहे.
गुगल मॅप्स ऑफलाइन कसे काम करतात?
ऑफलाइन गुगल मॅपचा वापर खास फीचरसह करता येणार आहे. यासाठी इंटरनेट कनेक्शनसह सर्वप्रथम नकाशावरील लोकेशन सेव्ह करावे लागेल.
गुगल मॅपवर ऑफलाईन लोकेशन कसे सेव्ह करावे?
- गुगल मॅप्सवर ऑफलाइन लोकेशन सेव्ह करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन असलेले मॅप्स ओपन करावे लागतील.
- आता तुम्हाला गुगल मॅप्सवर लोकेशन शोधावे लागेल.
- लोकेशन सेट झाल्यावर वरच्या उजव्या कोपऱ्यातील थ्री डॉट ऑप्शनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला मेनूमधून Download offline map वर टॅप करावे लागेल.
- डाउनलोड करण्यापूर्वी लोकेशन नीट आहे की नाही हे चेक करणे आवश्यक आहे.
- यानंतर तुम्हाला डाऊनलोड ऑप्शनवर टॅप करावं लागेल.
- गुगल मॅप ऑफलाईन सेव्ह करण्यासाठी फोनमध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे.
- इंटरनेट नसल्यास अॅपला भेट देताच सेव्ह केलेले लोकेशन पाहता आणि वापरता येते.
गुगल ऑफलाइन मॅप कधी काम करतो?
गुगल ऑफलाइन मॅपच्या मदतीने तुम्ही रस्त्यांपासून कोणत्याही बेसिक पॉईंटपर्यंत माहिती सेव्ह करू शकता. गुगल ऑफलाइन मॅपच्या मदतीने युजरला टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधा मिळते. वाटेत नेटवर्क नसल्यास त्रास होऊ नये म्हणून एखाद्या गंतव्यस्थानी जाण्यापूर्वी नकाशा ऑफलाइन सेव्ह केला जाऊ शकतो.
इतर महत्वाची बातमी-