एलॉन मस्क यांची SpaceX नव्या मोहिमेसाठी सज्ज; चार वैज्ञानिक अंतराळात जाणार
SpaceX Rocket : अंतराळ मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यातील सहकार्याचं कारण आहे. युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना हे फार महत्त्वाचं आहे.
SpaceX Falcon 9 Rocket : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांची अंतराळ संशोधन संस्था स्पेसएक्स नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेसएक्स आज नवीन रॉकेट लाँच करणार असून त्यामधून चार वैज्ञानिकांना स्पेस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट (SpaceX Falcon 9) रॉकेट लाँच करण्यात येणार आहे. हे रॉकेट अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे दोन अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS - International Space Station) घेऊन जाणार आहे.
आज स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट लाँच होणार
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) म्हणजे स्पेस स्टेशनच्या संशोधनात सोमवारी (27 फेब्रुवारी) आणखी एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट (SpaceX Falcon 9) रॉकेट आज सकाळी दोन NASA अंतराळवीर, एक रशियन अंतराळवीर आणि एक UAE अंतराळवीर यांना स्पेस स्टेशनवर घेऊन जाणार आहे.
एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचं नवं मिशन
स्पेसएक्स नवीन मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. स्पेस ड्रॅगन क्रू 6 (SpaceX Dragon Crew-6) हे स्पेसएक्सचं मिशन आज सुरु होईल. यासाठी स्पेसएक्स फॅलकॉन 9 रॉकेट (SpaceX Falcon 9) रॉकेट लाँच करण्यात येईल. फ्लोरिडा (Florida) येथील केनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) येथून दुपारी 1:45 वाजता (ET) हे रॉकेट लाँच करण्यात येईल. यासाठी हवामान परिस्थिती अनुकूल राहणं अपेक्षित आहे. क्रु ड्रॅगन कॅप्सूल (Dragon Crew Capsule) याला एंडेव्हर म्हणतात. सर्व काही नियोजित मोहिमेप्रमाणे पार पडलं तर, एंडेव्हर मंगळवारी पहाटे 2:38 वाजता (ET) ला ISS सह पोहोचेल. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
'या' देशांतील शास्त्रज्ञांचा मोहिमेत सहभाग
रिपोर्टनुसार, या मोहिमेअंतर्गत नासाचे स्टीफन बोवेन आणि वॉरेन हॉबर्ग, रशियाचे आंद्रे फदेव आणि संयुक्त अरब अमिरातीचे सुलतान अल-नियादी हे अंतराळवीर स्पेस स्टेशनवर सहा महिने घालवणार आहेत. 41 वर्षीय नेयादी हे अरब देशातून चौथे अंतराळवीर आणि तेल समृद्ध संयुक्त अरब अमिरातीतील दुसरे अंतराळवीर असतील. याआधी अमिरातीतील हज्जा अल-मन्सूरी हे 2019 मध्ये आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. नेयादी यांनी हे मिशन त्यांच्यासाठी "महान सन्मान" असल्याचं म्हटलं आहे. तसेच, होबर्ग, एंडेव्हर पायलट आणि रशियन मिशन स्पेशालिस्ट फेड्याएव यांची ही पहिली अंतराळ मोहिम असेल.
सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार अंतराळवीर
हे अंतराळवीर अवकाशातील विविध विषयांवर संशोधन करणार आहेत. अंतराळवीरांची ही टीम सहा महिने स्पेस स्टेशनवर (ISS) राहणार आहे. यावेळी अंतराळातील वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्यात येईल. यावरुन आगामी काळात अंतराळातील रहस्य उलगडण्यासाठी मदत होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :