एक्स्प्लोर

Samsung : सॅमसंगकडून भारतात Galaxy Watch 7, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स 3 सीरीज लाँच

Samsung Galaxy Watch 7 : सॅमसंगकडून गॅलॅक्‍सी वॉच 7, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स3 सीरीज भारतात लाँच झाले असून तुम्ही याची प्री-बुकींगही करु शकता.

मुंबई : सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने त्‍यांचे नवीन गॅलॅक्‍सी बड्स 3 (Samsung Galaxy Buds 3), गॅलॅक्‍सी बड्स 3 प्रो (Samsung Galaxy Buds 3 Pro), गॅलॅक्‍सी वॉच 7 (Samsung Galaxy Watch 7) आणि गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा  (Samsung Galaxy Watch Ultra) स्‍मार्टवॉचेस् प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. गॅलॅक्‍सी वॉच 7 आणि गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा सर्वांना एण्‍ड-टू-एण्‍ड वेलनेस अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या वीअरेबल्‍सच्‍या माध्‍यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत गॅलॅक्‍सी एआयची क्षमता विस्‍तारेल.

सॅमसंगकडून भारतात Galaxy Watch 7

गॅलॅक्‍सी वॉच पोर्टफोलिओमध्‍ये भर करण्‍यात आलेला नवीन आणि सर्वात शक्तिशाली डिवाईस गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा उच्‍च स्‍तरीय उपलब्‍धींसाठी अल्टिमेट इंटेलिजन्‍स आणि क्षमतांसह फिटनेस अनुभवांमध्‍ये वाढ करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आला आहे. गॅलॅक्‍सीवॉच अल्‍ट्रामध्‍ये नवीन कुशन डिझाइन आहे, ज्यामुळे संरक्षण आणि व्हिज्‍युअल लूक वाढते. या स्‍मार्टवॉचमध्‍ये टायटॅनियम ग्रेड 4 फ्रेम आणि 10 एटीएम वॉटर रेसिस्‍टण्‍स अशी सर्वोत्तम फिचर्स आहेत. समुद्रामध्‍ये पोहणे, अत्‍यंत प्रखर वातावरणात सायकल चालवणे अशा प्रगत फिटनेस अनुभवांसाठी लांबच्‍या अंतरापर्यंत हे कार्यरत राहू शकते.

गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा, बड्स 3 सीरीज लाँच

नवीन भर करण्‍यात आलेल्‍या फिचर्समध्ये क्विक बटनसह तुम्‍ही त्‍वरित वर्कआऊट्स सुरू करण्‍यासोबत त्‍यावर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्‍या गरजांनुसार इतर वैशिष्‍ट्यांवर देखरेख ठेवू शकता. तसेच, तुम्‍ही सुरक्षिततेसाठी इमर्जन्‍सी सायरन कार्यान्वित करू शकता. वर्कआऊटनंतर गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रावर लगेच आकडेवारी तपासू शकता. 3000 नीट्सच्‍या सर्वोच्‍च ब्राइटनेससह गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा प्रखर सूर्यप्रकाशात देखील स्क्रिनवरील बाबी सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची आणि वाचता येण्‍याची खात्री देतो. लांबच्‍या प्रवासादरम्‍यान कार्यरत राहण्‍यासाठी गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्‍ये गॅलॅक्‍सी वॉच लाइन-अपमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी आहे, जी पॉवर सेव्हिंगमध्‍ये जवळपास 100 तासांपर्यंत आणि एक्‍सरसाइज पॉवर सेव्हिंगमध्‍ये 48 तासांपर्यंत कार्यरत राहते.
 
गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा 47 मिमी आकारासह टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्‍हाइट आणि टायटॅनियम सिल्‍व्‍हर या आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रामध्‍ये 3 एनएम चिपसेट आहे. गॅलॅक्‍सी वॉच 7 सह, तुम्‍ही 100 हून अधिक वर्कआऊट्स अचूकपणे ट्रॅक करू शकता आणि तुमची ध्‍येय पूर्ण करण्‍यासाठी वर्कआऊट रूटिनसह विविध व्‍यायामांना एकत्र करत रूटिन्‍स तयार करू शकता. बॉडी कम्‍पोझिशनसह संपूर्ण शरीर आणि फिटनेसबाबत माहिती मिळवा, ज्‍यामधून तुम्‍हाला तुमच्‍या शारीरिक क्षमतेबाबत माहिती मिळेल.तसेच झोपेच्‍या विश्‍लेषणासाठी नवीन प्रगत गॅलॅक्‍सी एआय अल्‍गोदिरम आहे. इलेक्‍ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) आणि ब्‍लड प्रेशर (बीपी) मॉनिटरिंगसह हृदयाच्‍या आरोग्‍याबाबत सखोल माहिती मिळवा.       

गॅलॅक्‍सी वॉच 7, वॉच अल्‍ट्रा, बड्स 3 सीरीजसाठी प्री बुक ऑफर्स 

गॅलॅक्‍सी वॉच  प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 8000 रूपयांची मल्‍टी-बँक कॅशबॅक किंवा 8000 रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.

तसेच, गॅलॅक्‍सी वॉच अल्‍ट्रा प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 10,000 रूपयांची मल्‍टी-बँक कॅशबॅक किंवा 10,000 रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल.

वॉच 7 आणि वॉच अल्‍ट्राच्‍या किमती

मॉडेल                  व्हेरियंट                       किंमत

Watch7             Watch7 40 mm BT        29999

Watch7             Watch7 40 mm LTE       33999

Watch7             Watch7 44 mm BT        32999

Watch7             Watch7 44 mm LTE      36999

Watch Ultra      Watch Ultra                  59999

बड्स 3 सीरीजच्‍या किमती

मॉडेल                 किंमत

Buds3          14999

Buds3 Pro       19999

महत्त्वाच्या इतर बातम्या :

तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget