Realme Note Series : Realme ने लाँच केला Note Seriesचा पहिला स्मार्टफोन; शाओमी आणि इन्फिनिक्सला टक्कर देणार?
Realme Note Series : रियलमीने आपला नोट सीरिज (Realme Phone) स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रियलमीच्या नोट सीरिजची खूप चर्चा होत होती
Realme Note Series : रियलमीने आपला नोट सीरिज (Realme Phone) स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रियलमीच्या नोट सीरिजची खूप चर्चा होत होती. शाओमीची रेडमी नोट सीरिज आणि इन्फिनिक्सची नोट सीरिज यांना हा फोन चांगलीच टक्कर देणार आहे. त्यामुळे या फोनकडे सर्व कंपन्यांचं लक्ष लागलं आहे. रियलमी या कंपनीच्या फोनला सध्या चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. यापूर्वीच्या सगळ्या मॉडेल्सलादेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Realme ने लाँच केला नवा स्मार्टफोन
रियलमीच्या पहिल्या नोट लाइनअपच्या स्मार्टफोनचे नाव Realme Note 50 असे आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी स्क्रीन, मोठी आणि अनेक चांगले फीचर्स आहेत. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. भारतात रेडमी आणि इनफिनिक्सने नोट सीरिजमधील अनेक बजेट स्मार्टफोन लॉंच केले आहेत. याच कारणामुळे रियलमीने आता त्यांची स्पर्धा आणखी कठीण केली आहे. या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, व्हेरियंट आणि किंमत ीबद्दल जाणून घेऊया.
Realme Note Series स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
रियलमीच्या या फोनमध्ये युजर्संना 6.74 इंचाचा आयपीएल एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. या फोनमध्ये एचडी प्लस रिझोल्यूशन आहे. या फोनच्या मागील बाजूस 13मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, मोनोक्रोम सेन्सर आणि एलईडी फ्लॅश आहे. या फोनच्या फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये कंपनीने प्रोसेसरसाठी UNISOC T612 SoC चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU सपोर्ट केला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 वर आधारित रियलमी UI T Edition ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी आहे. 10 वॉट फास्ट चार्जिंग आणि यूएसबी टाइप सी पोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ड्युअल सिम, 4G एलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी, ड्युअल बँड, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, ग्लोनास आणि गॅलिलिओ सह अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.
व्हेरियंट आणि किंमत किती असेल?
रियलमीने आतापर्यंत हा फोन केवळ एका व्हेरियंटमध्ये सादर केला आहे, जो 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. या व्हेरियंटची किंमत 3,599 PHP म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 5,400 रुपये आहे. हा फोन सध्या फक्त फिलिपिन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र हा फोन व्हिएतनाम, थायलंड, इटली, बांगलादेश आणि म्यानमारमध्येही लाँच करण्यात आल्याची माहिती रियलमीने दिली आहे. भारतात या फोनच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा ही दावा केला जात आहे की, हा फोन रियलमी नोट 1 सीरिजचे बेस मॉडेल म्हणून भारतात लाँच केला जाऊ शकतो. आता रियलमी भारतात आपली नोट सीरिज कधी लाँच करते हे पाहावं लागेल.
इतर महत्वाची बातमी-
OnePlus Buds 3 : OnePlus Buds 3 चे फिचर्स लीक, 44 तासांचा बॅटरी बॅकअप अन् बरंच काही!