Most Sold Phone : आत्तापर्यंत 'या' फोनची जगात झाली सर्वाधिक विक्री, तुमच्यकडेही होता का हा फोन?
Most Sold Phone : मोबाईल उद्योगात एकेकाळी दबदबा असणारी कंपनी नोकियाचा Nokia 1100 हा फोन जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन आहे. आतापर्यंत जगभरात या फोनचे सुमारे 250 मिलियन (25 कोटी) युनिट्स विकले गेले आहेत.
Most Sold Phone : मोबाईल उद्योगात एकेकाळी दबदबा असणारी कंपनी नोकियाचा Nokia 1100 हा फोन जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन आहे. आतापर्यंत जगभरात या फोनचे सुमारे 250 मिलियन (25 कोटी) युनिट्स विकले गेले आहेत. नोकिया 1100 2003 मध्ये लॉन्च झाला होता. हा एक साधा आणि टिकाऊ फोन असल्याने याची प्रचंड विक्री झाली. याची कमी किंमत, लॉन्ग बॅटरी लाईक आणि युजर्स अनुकूल डिझाइनमुळे याची मागणी जगभरात झपाट्याने होऊ लागली. आजही अनेक लोकांकडे हा फोन आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
Nokia 1100 फीचर्स
नोकिया 1100 हा एक मोनोक्रोम डिस्प्ले आणि कॉम्पॅक्ट, हलके डिझाइन असलेला कँडी-बार शैलीचा फोन होता. यात 96 x 65 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह एक लहान स्क्रीन असलेला फोन आहे. यामध्ये यूजर्स पॅडचा वापर करून फोनचा मेनू नेव्हिगेट करू शकत होते. फोनमध्ये फ्लॅशलाइट होता, आणि त्याची बॅटरी 400 तास स्टँडबाय टाइम आणि 4 तासांपर्यंत टॉकटाइम देते.
Nokia 1100 इतकी विक्री का झाली?
नोकिया 1100 च्या यशाचे एक कारण म्हणजे कंपनीचे मूलभूत कार्यांवर लक्ष केंद्रित करणे. हे वापरण्यास सोपे उपकरण होते जे युजर्सला कॉल करण्यास, एसएमएस पाठविण्यास आणि प्राप्त करण्यास आणि रिमाइंडर आणि अलार्म सेट करण्यास सोपे होते. यात कॅल्क्युलेटर, स्टॉपवॉच, कॅलेंडर अशा अनेक सुविधा होत्या. इतके युनिट्स विकण्याचे एक कारण म्हणजे याची किंमत, हे देखील आहे. नोकिया 1100 ची किंमत कंपनीने खूप कमी ठेवली होती/
Nokia 1100 ची भारतात किंमत किती आहे?
नोकिया 1100 2003 मध्ये लॉन्च करण्यात आला होता, परंतु भारतात याची एंट्री 2005 मध्ये झाली. त्यावेळी याची किंमत सुमारे 4,000 ते 5,000 रुपये होती. नंतर कालांतराने Nokia 1100 ची किंमत आणखी घसरली आणि तो भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त फोनपैकी एक बनला.
एकूणच नोकिया 1100 च्या यशाचे श्रेय त्याच्या साध्या, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या डिझाइनला दिले जाऊ शकते. हा असा फोन होता जो कमी किमतीत अधिक सुरक्षा आणि गरजेचे फीचर्स असलेला डिव्हाईस होता. यामुळे जगभरातील युजर्ससाठी हा एक आकर्षक पर्याय बनला आहे.
Nokia X30 5G भारतात लॉन्च
Nokia X30 5G भारतात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. हा फोन क्लाउडी ब्लू आणि आइस व्हाईट कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची किंमत 48,999 रुपये आहे. फोनवर प्री-लॉन्च ऑफर देखील उपलब्ध आहे. एचएमडी ग्लोबल फोनवर 6,500 रुपये किमतीचे फायदे देत आहे, ज्यामध्ये डिव्हाइस प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर 1,000 रुपये सूट आणि 2,799 रुपयांचे नोकिया कम्फर्ट इयरबड्स आणि 2,999 रुपयांचे 33W चार्जर यांचा समावेश आहे. 21 फेब्रुवारीपासून डिव्हाइसची शिपिंग सुरू होईल.