Lava Yuva 2 Pro ची ऑनलाइन सेल सुरू, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स
Lava Yuva 2 Pro : मोबाईल निर्माता Lava ने आपला नवीन स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. आज दुपारी 12 वाजल्यापासून भारतात Amazon वर स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे.
Lava Yuva 2 Pro : मोबाईल निर्माता Lava ने आपला नवीन स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला होता. हा असा स्मार्टफोन आहे जो जवळजवळ प्रत्येक व्यक्ती खरेदी करू शकतो. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज दुपारी 12 वाजल्यापासून भारतात Amazon वर स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. हा फोन तुम्ही आता Amazon वरून ऑनलाइन खरेदी करू शकता. Lava Yuva 2 Pro हा कमी किमतीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला फोन ऑनलाइन खरेदी करायचा नसेल तर ऑफलाइन स्टोअरमध्येही फोन उपलब्ध आहेत. याशिवाय लावा इंडियाच्या स्टोअरमधूनही हा फोन विकला जात आहे. याच स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
लावा युवा 2 प्रो किंमत
Lava Yuva 2 Pro ची किंमत 7999 रुपये आहे. याच किमतीत हा फोन Amazon वर उपलब्ध आहे. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर हा फोन तीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये ग्लास व्हाइट, ग्लास ग्रीन आणि ग्लास लॅव्हेंडर यांचा समावेश आहे. Lava ने त्याच्या नवीन स्मार्टफोनसाठी Doubtnut या शैक्षणिक व्यासपीठाशी भागीदारी केली आहे.
Lava Yuva 2 Pro चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: 6.5-इंच LCD पॅनेल
- प्रोसेसर: Helio G37 चिपसेट
- रॅम आणि स्टोरेज: 4 जीबी रॅम आणि 64 जीबी
या लावा स्मार्टफोनचा डिस्प्ले HD+ रिझोल्यूशनसह येतो, जो 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हँडसेटमध्ये व्हर्च्युअल रॅमची सुविधाही आहे. फोनमध्ये 13 MP प्राथमिक कॅमेरा आणि मागील बाजूस दोन VGA कॅमेरे आहेत. यात 5MP सेल्फी कॅमेरा आहे. Lava Yuva 2 Pro मध्ये 5000mAh बॅटरी आहे. ज्यामध्ये 10W टाइप C USB पोर्ट सपोर्ट आहे. हा स्मार्टफोन Android 12 OS वर काम करतो.
सॅमसंग 'हा' फोन 16 मार्चला लॉन्च करणार
Samsung 16 मार्च रोजी भारतात Samsung Galaxy A54 5G स्मार्टफोन लॉन्च करेल. स्मार्टफोनला 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. तुम्हाला मोबाईल फोनमध्ये 5000 MH बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. कंपनी सुमारे 30,000 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते.
इतर बातमी: