(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vivo X100 Series : Vivo X100 Series लाँच, जबरदस्त कॅमेरा अन् भन्नाट फिचर्स, Samsung Galaxy S24 ला देणार टक्कर!
Vivo X100 Series: विवोने आपल्या ग्राहकांसाठी आपली लेटेस्ट फ्लॅगशिप सीरिज Vivo X100 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Vivo X100 आणि Vivo X100 प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे.
vivo X100 Series : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी विवोने (Vivo Mobile) आपल्या ग्राहकांसाठी आपली लेटेस्ट फ्लॅगशिप सीरिज Vivo X100 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Vivo X100 आणि Vivo X100 प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने हे डिव्हाइस विवो एक्स Vivo X90 नंतरचा हा फोन म्हणून लाँच केले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 120Hz चा रिफ्रेश रेट, 5400mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि अनेक खास फीचर्स मिळतात. आपण या डिव्हाइसशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत...
Vivo X100 किंमत किती?
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर X100 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत चीनमध्ये 3,999 युआन म्हणजेच जवळपास 47,105 रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर X100 Pro 16GB रॅम + 512GB स्टोरेज पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे, ज्याची किंमत 4,999युआन म्हणजेच जवळपास 59,685 रुपये असू शकते. हे दोन्ही फोन स्टाररेल ब्लू आणि अॅस्टरॉइड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले आहेत. दोन्ही फोनची जागतिक किंमत अद्याप समोर आलेली नाही.
Vivo X100 सीरिज स्पेसिफिकेशन्स कोणते?
विवो X100 आणि X100 प्रो मध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा कर्व-OLED LTPO डिस्प्ले मिळतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 2160Hz PWM डिमिंग आणि3000nitsपर्यंत ब्राइटनेस मिळतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या सीरिजमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 9300 चिपसेट मिळतो, ज्यात 116GB LPDDR5x रॅम आणि 512UFS 4.0 स्टोरेज मिळते.
Vivo X100 सीरिज कॅमेरा कसा आहे?
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, Vivo X100 मध्ये आपल्याला OIS 50MP Sony IMX920 VCS प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी सॅमसंग JN1 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर मिळतो. Vivo X100 प्रो मध्ये 50MP 1 इंच Sony IMX989 VCS मेन कॅमेरा, 50 एमपी सॅमसंग जेएन 1 अल्ट्रा-वाइड आणि 64 एमपी रियर कॅमेरा आहे. X100 सीरिजमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ३32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तरX100 मध्ये 120W चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी आहे. X100प्रो मध्ये 1100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगसह5,400mAh बॅटरी देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Samsung Mobile : भारत सरकारचा नवा इशारा! सॅमसंग S23, Fold 5 युझर्सला फटका बसणार? काय आहे नेमकं कारण?