एक्स्प्लोर

Google Maps : पेट्रोल डिझेलचा खर्च होणार कमी, गुगल मॅप्समध्ये येतंय नवं फिचर

Google Maps : Google Maps मध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले जात आहेत. ज्यामुळे लोकांना वेळही वाचेल. अॅपमध्ये काय येणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई : एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी Google Maps वापरत असाल. आता या अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स आणले जातायत. ज्यामुळे तुम्हाला एक नवा अनुभव देखील मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे पैसा आणि वेळही वाचणार असल्याचं सांगण्यात येतंय. गुगल नवीन वर्षापासून या अॅपमध्ये 'फ्युएल एफिशियंट रूटिंग' फीचर आणत आहे. मात्र, त्यावेळी ते फक्त अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांपुरतेच मर्यादित होते. आता गुगल नवीन वर्षापासून भारतातही हे फीचर देणार आहे.

पर्यावरण वाचवण्यासही होईल मदत

या फीचरचा फायदा दुचाकी आणि चारचाकीने प्रवास करणाऱ्या लोकांना होणार असून त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. जर तुम्ही विचार करत असाल तर प्रत्यक्षात या फीचरच्या मदतीने कंपनी तुम्हाला असा मार्ग सांगेल ज्यात तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कमी रहदारी असेल आणि तुमच्या वाहनाच्या इंजिननुसार कोणता मार्ग सर्वोत्तम आहे हे गूगल मॅप तुम्हाला सांगेल. एआयच्या मदतीने कंपनी तुम्हाला रस्त्याच्या उंची आणि रहदारीनुसार सर्वोत्तम मार्ग सांगेल. कंपनीने सांगितले की या वैशिष्ट्याच्या मदतीने आतापर्यंत 2.4 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी केले आहे.

'हे' फीचर अज्ञात लोकेशन्स समजण्यास करेल मदत

अज्ञात लोकेशन्स समजून घेण्यासाठी कंपनी Google Map मध्ये 'Address Description' फीचर जोडत आहे. या फीचर अंतर्गत, जेव्हा कोणी तुमच्यासोबत एखादे लोकेशन शेअर करते, तेव्हा कंपनी तुम्हाला त्या ठिकाणाभोवती 5 लँडमार्क आणि प्रसिद्ध ठिकाणे दाखवेल जेणेकरून तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर सहज पोहोचू शकाल. नवीन वर्षापासून लोकांनाही हे फीचर मिळण्यास सुरुवात होईल.

नव्या वर्षात मिळणार नवे अपडेट

Google चे हे अपडेट लवकरच Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. गुगलचे हे मॅप अपडेट पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. जिओफेन्स वॉरंटच्या वाढत्या गैरवापरामुळे असा बदल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.जगभरातील अधिकारी जिओफेन्स वॉरंटद्वारे लोकांच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप कर आहेत, त्यामुळे ही मागणी वारंवार केली जात होती. गुगलने अखेर याची अंमलबजावणी केली आहे.

निवडक लोकेशन करता येणार डिलीट

याशिवाय गुगलच्या मॅप्स सेवेतील आणखी एक मोठा बदल म्हणजे निवडक डेटा डिलीट करण्याची सुविधा. आता गुगल आपल्या वापरकर्त्यांना विशिष्ट स्थानाशी संबंधित इतिहास हटविण्याची सुविधा देखील देईल. गुगल आधीच लोकेशन सक्षम-अक्षम करण्याची सुविधा देत आहे. आता वापरकर्ते लोकेशन सर्व्हिस चालू ठेवल्यानंतरही ती पूर्णपणे नियंत्रित करू शकतील. हे वापरकर्त्यावर अवलंबून असेल की त्याला त्याचा डेटा किती प्रमाणात साठवायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget