Android स्मार्टफोन बंद असताना देखील शोधणं होईल सोपं; हे भन्नाट फीचर तुमच्यासाठी फायदेशीर
Android 15 Feature Expectations : आगामी Android 15 बद्दल असे सांगितले जात आहे की, Pixel यूजर्ससाठी एक मोठे अपडेट दिले जाऊ शकते.
Android 15 Feature Expectations : सध्या सगळ्या अॅंड्रोईड (Android) निर्मात्या कंपन्या आपला स्मार्टफोन (Smartphone) अपडेट करण्यावर भर देतायत. Google देखील आजकाल आपल्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम Android 15 वर काम करत आहे. आगामी एंड्रॉइड 15 बद्दल असे सांगितले जात आहे की Pixel यूजर्ससाठी एक मोठे अपडेट दिले जात आहे. त्यानुसार, आता पिक्सेल यूजर्स आपला हरवलेला स्मार्टफोन अगदी सहज शोधू शकतील असं सांगण्यात आलं आहे. पिक्सेल 8, पिक्सेल 8 प्रो आणि गुगलच्या आगामी फोनमध्ये Find My Device बंद होण्यावर देखील काम करणार आहे. तसेच, हे अपडेट आगामी Android 15 मधून देखील मिळण्यास सुरु होऊ शकते.
'Find My Device' फीचर काय आहे?
Android मध्ये Find My Device या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचा हरवलेला फोन सहज ट्रॅक करू शकतात. ही ब्लूटूथ आधारित ट्रॅकिंग यंत्रणा आहे, जी स्मार्टफोन बंद केल्यावर काम करत नाही.
नवीन फीचर कसं काम करेल?
याला सामोरे जाण्यासाठी, कंपनी पॉवर्ड ऑफ फाइंडिंग सादर करू शकते. ही नवीन प्रणाली प्रीकॉम्प्युटेड ब्लूटूथ बीकन्ससह डिव्हाईस मेमरी नियंत्रित करेल. मात्र, यासाठी डिव्हाईसच्या हार्डवेअरमध्ये काही बदल करावे लागतील, जेणेकरून फोन बंद झाल्यावर ब्लूटूथ कंट्रोलला वीजपुरवठा मिळत राहील. यासोबतच ब्लूटूथ फाइंडर, डिव्हाइसचे तपशील शेअर करण्यासाठी हार्डवेअर ॲबस्ट्रॅक्शन लेयर (HAL) ला सपोर्ट करेल. अँड्रॉईड तज्ज्ञ मिशाल रहमान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गुगलच्या पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो सह आगामी स्मार्टफोनमध्ये हे फीचर दिले जाईल असा दावाही त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :