Airtel Recharge :मोबाईल रिचार्जवर फ्री Netflix सब्सक्रिप्शन; Airtel कडून पहिल्यांदाच ऑफर, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन...
एअरटेल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एअरटेल पहिल्यांदाच आपल्या प्रीपेड प्लॅनसोबत ओटीटी अॅप नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देत आहे.
Airtel Recharge : एअरटेल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता (Airtel Recharge) एअरटेल पहिल्यांदाच आपल्या प्रीपेड प्लॅनसोबत ओटीटी अॅप नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देत आहे. याशिवाय तुम्हाला हाय स्पीड 5 जी इंटरनेदेखील आनंद मिळेल. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनी एअरटेल युजर्सला मोबाइल रिचार्जवर 84 दिवसांसाठी नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन देत आहे. कंपनीने या संदर्भात कोणतीही माहिती जाहीरपणे शेअर केली नसली तरी एअरटेलने हा प्लॅन वेबसाइट आणि अॅपमध्ये जोडला आहे.
नेटफ्लिक्ससाठी किती रिचार्ज करावे लागेल?
एअरटेलने 1,499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. यात तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 3 GB हाय स्पीड 5जी इंटरनेट, 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन मोफत मिळते. भारतात नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शनची किंमत 199 रुपये आहे. कंपनीने पहिल्यांदाच प्रीपेड प्लॅनसोबत नेटफ्लिक्स बेसिकचे सब्सक्रिप्शन दिले आहे. मात्र, इतर टेलिकॉम ऑपरेटर्स हे आधीच करत आहेत.
हे सर्व फायदे जिओच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात..
जर तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल तर तुम्ही 1,499 रुपयांचा प्लॅन देखील घेऊ शकता. या प्लानमध्ये कंपनी तुम्हाला 84 दिवसांसाठी नेटफ्लिक्स बेसिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्हीसह दररोज 3 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देते. जर तुम्हाला जिओची वेलकम ऑफर मिळाली असेल तर तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकता.
रोज 3 GB डेटा पॅक असलेल्या व्हीआयच्या प्लॅनची किंमत
व्होडाफोन आयडिया देखील दररोज 3 जीबी डेटासह प्लॅन ऑफर करते. कंपनी 359 रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करते. मात्र, यात तुम्हाला कोणत्याही ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. व्हीआय आपल्या प्रीपेड प्लॅनसह रात्रभर बिंजची सुविधा देते ज्यामध्ये आपण रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कितीही डेटा वापरू शकता.
Airtel 5G Plus ऑन-द-गो वाय-फाय सारखा स्पीड
Airtel 5G Plus सेवा सुरु होण्यापूर्वी, COD, Fornite आणि काऊंटर स्ट्राईक सारखे लोकप्रिय गेम ऑन-द-गो खेळताना युझर्सना सर्वाधिक अडचणी येत होत्या. कमी वेग आणि जास्त विलंब (लॅग) यामुळे गेमिंगप्रेमी ऑन-द-गो अशा खेळांचा उत्तम अनुभव घेऊ शकत नव्हते. त्यासाठी चांगली बँडविड्थची आवश्यकता असते आणि Airtel 5G Plus 30 पट वेगवान स्पीड देऊन ही गरज पूर्ण करते.
इतर महत्वाची बातमी-