(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmika Mandanna Deepfake : AI चा वापर, एक deepfake Video अन् आयुष्य बरबाद; किती वर्षांची शिक्षा अन् किती लाख रुपये दंड?
AI चा वापर करुन DEEPFAKE व्हिडीओ जर तुम्ही कोणाचे तयार करत असाल तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते आणि तुम्हाला किती दंड होऊ शकतो पाहुयात...
Rashmika Mandanna Deepfake : भारतीय अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा डीपफेकच्या मदतीने दुसऱ्याच्या व्हिडिओवर पॅच करण्यात आला आहे. AI च्या मदतीने हा व्हिडीओ तयार केला जातो. एक फोटो वापरुन त्याचे विविध प्रकारचे व्हिडीओ, खोटा फोटो तयार करण्यात येतो. याला फोटो मॉर्फिंगदेखील म्हटलं जातं. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगते आहे. मात्र असे व्हिडीओ जर तुम्ही कोणाचे तयार करत असाल तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते आणि तुम्हाला किती दंड होऊ शकतो पाहुयात...
अशा खोट्या माहितीसाठी भारत सरकारने शिक्षा आणि दंडाची तरतूद केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कायद्याची माहिती सांगितली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार 2000 च्या कलम 66D च्या अंतर्गत कारवाई होऊ शकते. हे कलम कप्युटरचा वापर करून फसवणूक केल्याबद्दल शिक्षेशी संबंधित आहे. अशा प्रकारचा एखादा फोटो किंवा मॉर्फिंग केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो. हा सगळा प्रकार पाहून या संदर्भातले नियम कठोर करण्याकडे सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासोबतच अशा प्रकराच्या सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांंना युझरवर थेट कारवाई करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. शिवाय युझरचा आयपी अॅड्रेस शोधून त्याच्यावर लक्ष ठेवून यापुढे असे प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
डीप फेक म्हणजे काय?
डीपफेक टेक्नॉलॉजी एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ तयार करू शकते. 'Deep Learning' आणि 'Fake' अशा दोन शब्दांपासून DeepFake हा शब्द तयार झाला आहे. ही टेक्नॉलॉजी खोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी Generative Adversarial Networks (GANs) याचा वापर करते. यामध्ये केवळ या व्यक्तीचा चेहराच नाही, तर त्याचा आवाज, हावभाव, डोळ्यांच्या पापण्या, बोलताना होणारी ओठांची हालचाल, डोळ्यांचे भाव आणि अशा कित्येक गोष्टी कॉपी करता येऊ शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीचा काहीही बोलतानाचा व्हिडिओ तयार करता येऊ शकतो.
डीपफेक भयानक प्रकार...
डिप फेक हा जो प्रकार आहे, हा तितकासा साधा सोपा सरळ नाहीये. AI टेक्नॉलॉजी किती भयानक असू शकते याची फक्त ही एक झलक आहे. एलॉन मस्कचं एक स्टेटमेंट काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालं होतं. तेदेखील त्यात म्हणाले होते की AI म्हणजेच ऑर्टीफिशल इंटेलिज्स ही टेक्नॉलॉजी अतिशय भयानक आह. आणि तशाच गोष्टी घडताना समोर यायला सुरुवात झाली आहे. रश्मिका याला बळी पडलीये हे आपल्याला माहित झालं कारण ती एक सेलिब्रेटी आहे, पॉप्यूलर फेस आहे. पण अशा कित्येक केसेस आहेत ज्याबद्दल आपल्याला साधी कल्पनाही नाहीये.