अवघ्या चार सामन्यात धुरळा उडवला, मोहम्मद शमीला थेट अभिनेत्रीची लग्नासाठी ऑफर, फक्त एक अट
Mohammed Shami : भारतात सुरु असलेला विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकलाय. विश्वचषक रोमांचक स्थितीत पोहचलाय. शामीला लग्नाची ऑफर मिळाली आहे.
Mohammed Shami : भारतात सुरु असलेला विश्वचषक उत्तरार्धाकडे झुकलाय. विश्वचषक रोमांचक स्थितीत पोहचलाय. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. अखेरच्या चार सामन्यात मोहम्मद शामीने आग ओखणारी गोलंदाजी केली. शामीन चार सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. शामीच्या कामगिरीवर सर्वजण खूश आहेत. या कामगिरीमुळे शामीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. राजकीय नेत्यांपासून, बॉलिवूड अभिनेता, अभिनेत्रीही शामीचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या शामीला अभिनेत्रीने थेट लग्नाची ऑफर दिली. पण त्यासाठी एक अट घातली आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु झाली. बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने शामीला लग्नाची ऑफर दिली. त्यासोबत तिने एक अट घातली आहे. पायल घोषच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय.
बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने मोहम्मद शामीला लग्नाची ऑफर घातली. भारताने सामना जिंकल्यानंतर पायल घोष हिने सोशल मीडियावर पोस्ट करत शामीला लग्नाची ऑफर दिली. पण तिने शामीला अट घातली. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, शामी तू इंग्रजी सुधार, मी लग्नसाठी तयार आहे.
पायल घोष हिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. शामीने चार सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरोधात 5, इंग्लंडविरोधात 4, श्रीलंकाविरोधात 5 आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात दोन विकेट्स घेतल्या आहेत. शामीच्या भेदक माऱ्याची प्रतिस्पर्धी फलंदाजामध्ये दहशत झाली आहे.
#Shami Tum apna English sudharlo, I’m ready to marry you 🤣🤣
— Payal Ghoshॐ (@iampayalghosh) November 2, 2023
पायल घोष सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिने अन्य एका पोस्टमध्ये म्हटले की, शामी तू विश्वचषकात हिरो व्हावा, असे मला वाटतेय. 'मोहम्मद शमी सेमीफायनलमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी माझ्याकडून कोणत्या प्रकारचे नैतिक समर्थन हवेय. आपल्याला पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचायचे. विश्वचषकात तू हिरो व्हावे, असे मला वाटतेय, अशी पोस्ट पायल घोष हिने केली आहे.
मोहम्मद शामीची विश्वचषकातील कामगिरी -
मोहम्मद शामीने याला यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीच्या पाच सामन्यांना बेंचवरच बसवले होते. पण पुण्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर मोहम्मद शामीला टीम इंडियात स्थान मिळाले. मोहम्मद शामीने तीन सामन्यात 14 विकेट् घेऊन खळबळ माजवली. शामीने न्यूझीलंडविरोधात पाच, इंग्लंडविरोधात चार आणि श्रीलंकेविरोधात पाच विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने झहीर खानचा विक्रम मोडीत काढलाय. मोहम्मद शामी आयसीसी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. आजच आयसीसीने वनडे क्रमवारी जारी केली. यामध्ये मोहम्मद शामीने दहावे स्थान काबिज केलेय.