Smart Toilet Seat: स्मार्टफोन, स्मार्ट टिव्हीनंतर आता स्मार्ट कमोडही, आता Alexa करणार काम, काय आहे वैशिष्ट्ये?
Smart Toilet Seat: लास व्हेगास येथे CES 2024 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 9 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात एकापेक्षा एक गोष्टी मांडल्या जात आहेत.
मुंबई : स्मार्ट हा शब्द आता आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गॅजेट्सपासून ते आपल्या राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीपर्यंत सर्व काही स्मार्ट होत आहे. लोक स्मार्ट राहणीमान आणि विचारसरणीला प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान, स्मार्टफोन (Smart Phones) आणि स्मार्ट टीव्हीनंतर (Smart TV) आता स्मार्ट कमोड (Smart Comode) बाजारात आलेत. खरंतर, लास वेगासमध्ये CES 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना CES म्हणजे हा एक ग्राहक इलेक्ट्रॉनिक शो आहे जो दरवर्षी आयोजित केला जातो. ज्यामध्ये जगातील कंपन्या त्यांची नवीन उत्पादने प्रदर्शित करतात.
या कार्यक्रमात Kohler नावाच्या कंपनीने एक स्मार्ट कमोड लाँच केला आहे. या कमोडची खासियत काय आहे आणि त्याची किंमत काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान अमेरिकेत या कमोडची विक्री सुरू झाली आहे. मात्र, सध्या ते भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
काय आहे या कमोडची किंमत?
Kohler या स्मार्ट कमोडचे नाव PureWash E930 bidet seat आहे. ज्याची किंमत 1289.40 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 1,07,036 रुपये आहे. पांढऱ्या रंगागाचाच हा कमोड आहे. दरम्यान हे स्मार्ट कमोड कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर कसा काम करते तुम्ही पाहू शकता.
काय आहेत वैशिष्ट्ये?
या स्मार्ट कमोडचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हात न वापरता सर्व कामे होतील. म्हणजे तुम्हाला जेट स्प्रे वगैरे काहीही उचलण्याची गरज नाही. हा कमोड व्हॉईस सपोर्टसह येतो आणि Amazon Alexa आणि Google Home शी कनेक्ट होतो. याशिवाय, तुम्ही अॅपवरूनही ते नियंत्रित करू शकता. हे रिमोटसह देखील येते जे दोन वापरकर्त्यांना त्यांच्या सोयीनुसार टॉयलेट सीट नियोजित करता येते. तुम्ही रिमोट किंवा अलेक्सा द्वारे सीट आणि पाण्याचे तापमान, पाण्याचा दाब, फ्रंट आणि बॅक वॉशर इत्यादी सर्वकाही ऑपरेट करू शकता. यामध्ये तुम्हाला किड्स आणि बूस्ट मोड मिळेल जो लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी जेटचं प्रेशन नियंत्रित करते.
कमोडमध्ये उपलब्ध आहे मसाज मोड
या स्मार्ट कमोडमध्ये, तुम्हाला मसाज मोड देखील मिळतो जो तुम्हाला मसाज करत असल्याप्रमाणे जेट स्प्रे ऑपरेट करतो. यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक यूव्ही क्लीनिंग देखील मिळते जे दर 24 तासांनी जेट स्प्रे रॉड साफ करते. सीटचे तापमान सेट करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला कमोडमध्ये एअर ड्रायर देखील मिळेल ज्याचा वेग तुम्ही ठरवू शकता. यामध्ये रात्रीच्या वेळी कमोड वापरण्यासाठी सभोवतालची प्रकाश व्यवस्था देखील आहे.