6G Race: 2028 पर्यंत दक्षिण कोरियामध्ये 6G होणार लॉन्च, ही सर्व्हिस भारतात कधी होणार सुरु?
6G in India: एकीकडे भारतात 5G नेटवर्कचा विस्तार सुरू असताना दुसरीकडे परदेशात 6G नेटवर्कचे काम वेगाने सुरू झाले आहे.
6G in India: सध्या देशात असे फक्त 2 दूरसंचार ऑपरेटर आहेत जे ग्राहकांना 5G सेवा देत आहेत. यामध्ये रिलायन्स जिओ आणि इंडियन एअरटेलचा समावेश आहे. एकीकडे भारतात 5G नेटवर्कचा विस्तार सुरू असताना दुसरीकडे परदेशात 6G नेटवर्कचे काम वेगाने सुरू झाले आहे. दरम्यान, दक्षिण कोरिया सरकारने 2028 पर्यंत देशात सेल्युलर तंत्रज्ञानाची 6 वे जनरेशन म्हणजेच 6G नेटवर्क लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरियाच्या मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, सरकारने स्थानिक कंपन्यांना 6G मध्ये (South Korea 6g Network) वापरलेली सामग्री बनविण्यास सांगितले आहे. जेणेकरून नवीन नेटवर्क वेळेवर लॉन्च करता येईल आणि असे करणारा तो जगातील पहिला देश (South Korea 6g Network) ठरेल. हा प्रकल्प सुमारे 625.3 अब्ज वॉन (सुमारे 3,978 कोटी रुपये) किमतीचा आहे.
6G in India: या वर्षापर्यंत भारतात सुरु होईल 6G नेटवर्क
इतर देशांप्रमाणे भारतालाही (India 6g Network) 6G तंत्रज्ञानात आघाडीवर राहायचे आहे. पंतप्रधान मोदींनी आधीच सांगितले आहे की, 6G साठी (India 6g Network) एक टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. जी या दिशेने काम करत आहे. ते म्हणाले की, या दशकाच्या अखेरीस देशात 6G नेटवर्क (India 6g Network) सुरू होईल. त्याचबरोबर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही 6G नेटवर्कमध्ये भारत (India 6g Network) आघाडीवर असेल असे म्हटले आहे. म्हणजेच या दशकाच्या समाप्तीपूर्वी संपूर्ण देशाला 6G नेटवर्क मिळू शकेल.
1980 मध्ये झाली 1G ची सुरुवात
1G ची सुरुवात 1980 मध्ये झाली. त्यानंतर लोक फक्त 1G नेटवर्कद्वारे व्हॉईस कॉल करू शकत होते. त्यानंतर 1990 मध्ये सेकंड जनरेशन नेटवर्क 2G सुरू झाले. त्याचप्रमाणे 2000 मध्ये 3G आले. 3G नेटवर्क आल्यानंतर लोकांनी पहिल्यांदा डेटा वापरला. हळूहळू 4G नेटवर्क आले. ज्यामध्ये लोकांना चांगला इंटरनेट स्पीड मिळाला आणि आता 5G विस्तारत आहे. दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे की, लोकांना 4G च्या तुलनेत 5G नेटवर्कमध्ये चांगला इंटरनेट स्पीड आणि चांगला कॉलिंग अनुभव मिळतो. सध्या जिओची 5G सेवा देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये लाईव्ह झाली आहे. यातच एअरटेलने 50 हून अधिक शहरे देखील कव्हर केली आहेत.
इतर महत्वाच्या बातमी:
प्रतीक्षा संपली! Samsung Galaxy S23 ची विक्री भारतात सुरू; जबरदस्त फिचर्ससह 'ही' असेल किंमत