प्रतीक्षा संपली! Samsung Galaxy S23 ची विक्री भारतात सुरू; जबरदस्त फिचर्ससह 'ही' असेल किंमत
Samsung Galaxy S23 Series : Samsung Galaxy S23 सीरीजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra लाँच करण्यात आले आहेत.
Samsung Galaxy S23 Series : सॅमसंगच्या स्मार्टफोनची क्रेझ अजूनही तरूणांमध्ये आहे. यामधील फिचर्स, कॅमेरा आणि इतर स्पेसिफिकेशन ग्राहकांना आकर्षित करतात. सॅमसंगने या महिन्याच्या सुरुवातीला गॅलेक्सीच्या इव्हेंटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरिज लॉन्च केली होती. जागतिक पातळीवर स्मार्टफोनचं लॉन्चिंग झाल्यानंतरच्या एक दिवसानंतर हा स्मार्टफोन भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आला. आता जवळपास तीन आठवड्यानंतर सॅमसंगची गॅलेक्सी S23 सीरिज भारतात उपलब्ध झाली आहे. Samsung Galaxy S23 सीरीज मध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra यांचा समावेश आहे.
Samsung Galaxy S23 Series ची किंमत किती?
1. Samsung Galaxy S23 च्या 8+256GB व्हर्जनची भारतात किंमत 79,999 आहे. तर, 8+128GB व्हर्जनची किंमत 74,999 रुपये आहे.
2. Samsung Galaxy S23 Plus च्या 8+256GB व्हेरिएंटची किंमत 94,999 रुपये आहे, तर 8+512GB व्हेरिएंटची किंमत 1,04,999 रुपये आहे.
3. Samsung Galaxy S23 Ultra तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. यामधील 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज स्पेससह त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत भारतात 1,24,999 रुपये आहे. तर, 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज स्पेससह टॉप व्हेरिएंटची किंमत 1,54,999 रुपये आहे. यासोबतच 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज स्पेस असलेला आणखी एक प्रकार आहे ज्याची किंमत 1,34,999 रुपये आहे.
हे तिन्ही स्मार्टफोन Samsung.com च्या वेबसाईटवर आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध झाले आहेत. कलर व्हेरिएंटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, यामध्ये फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन आणि लॅव्हेंडर कलर उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy S23 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S23 Ultra मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह 6.8-इंचाचा QHD+ डायनॅमिक AMOLED 2x 120Hz डिस्प्ले आहे. फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येतो. स्मार्टफोनमध्ये 200MP + 12MP + 10MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे.
Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus चे स्पेसिफिकेशन्स काय?
Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP + 12MP + 10MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंट 12MP कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोनमधील फरक फक्त डिस्प्ले आणि बॅटरीचा आहे. Galaxy S23 मध्ये 6.1-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2x 120Hz डिस्प्ले आणि 3,900mAh बॅटरी आहे, Galaxy S23 Plus मध्ये 6.6-इंच FHD+ डायनॅमिक AMOLED 2x 120Hz, battery 04mAh डिस्प्ले आणि 3,900mAh बॅटरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :