ZIM vs IND: 'हलक्यात घेऊ नका, आम्ही भारताला हरवू शकतो' झिम्बाब्वेचे प्रशिक्षक डेव ह्यूटनचा इशारा
ZIM vs IND ODI: इंग्लंड, वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर भारत झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (ZIM vs IND) रवाना झालाय.
ZIM vs IND ODI: इंग्लंड, वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर भारत झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (ZIM vs IND) रवाना झालाय. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. या दौऱ्यात भारताचा सलामीवीर केएल राहुल भारताचं नेतृत्व करताना दिसणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. यापूर्वी झिम्बाब्वेचा प्रशिक्षक ड्वेव ह्युटननं (Dave Houghton) भारताला सावधानीचा इशारा दिला आहे. तसेच झिम्बाब्वेच्या संघाला हलक्यात न घेण्याचा इशाराही दिलाय.
झिम्बाब्वेनं बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका जिंकली आहे. एवढेच नव्हे तर, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठीही झिम्बाब्वेनं पात्रता मिळवली आहे. यामुळं भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ आत्मविश्वासानं मैदानात उतरेल. ड्वेन ह्युटनच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेचा संघ चांगली कामगिरी करत असल्याचं दिसत आहे. ड्वेन ह्युटन म्हणाला की, भारतानं झिम्बाब्वेच्या संघाला हलक्यात घेऊ नये. कारण झिम्बाब्वेचा संघ भारताला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. याशिवाय, असे काही फलंदाज आहेत, जे झिम्बाब्वेला विजय मिळवून देऊ शकतात. सध्या झिम्बाब्वे संघात सर्वकाही ठिक आहे. परंतु, भारताविरुद्ध झिम्बाब्वेच्या संघाची अग्निपरीक्षा आहे. परंतु, मी संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा करतो."
डे्वन ह्यूटन नेतृत्वाखाली झिम्बाव्वेची कामगिरी
प्रशिक्षक डे्वन ह्यूटन यांच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेची अलीकडील कामगिरी चांगली आहे. ड्वेन ह्युटनच्या मार्गदर्शनाखाली बांग्लादेशविरुद्ध पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली आहे. झिम्बाब्वेनं टी-20 मालिका देखील 2-1 ने जिंकली, जी त्यांचा या फॉरमॅटमधील सर्वोच्च संघाविरुद्धचा पहिला मालिका विजय होता.
भारत- झिम्बाव्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 18 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
दुसरा एकदिवसीय सामना | 20 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 ऑगस्ट 2022 | हरारे स्पोर्ट्स क्लब |
केएल राहुल संभाळणार भारतीय संघाची धुरा
झिम्बाब्वे दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या दौऱ्यात केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. तर, शिखर धवनकडं उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 2016 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केलाय.
हे देखील वाचा-
US Open 2022: नोवाक जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर, कोरोना लशीला विरोध करणं पडलं महागात!