एक्स्प्लोर

Sanju Samson on Vaibhav Suryavanshi : पहिला चान्स मिळाला तर उडवून टाकू...; वैभव सूर्यवंशीच्या IPL डेब्यूवेळी ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? संजू सॅमसनचा खुलासा

Sanju Samson on Vaibhav Suryavanshi : नवी दिल्लीमध्ये झालेल्या बीसीसीआय नमन पुरस्कार2026 कार्यक्रमादरम्यान संजू सॅमसनने वैभव सूर्यवंशीबाबत एक किस्सा सांगितला.

Sanju Samson on Vaibhav Suryavanshi IPL Debut : भारतीय क्रिकेटमध्ये उदयोन्मुख खेळाडूंची कमतरता नाही. मात्र काही खेळाडू आपल्या निर्भीड विचारांमुळे आणि आत्मविश्वासामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीलाच चर्चेत येतात. असंच एक नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने त्याच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगितला.

नवी दिल्लीमध्ये झालेल्या बीसीसीआय नमन पुरस्कार2026 (BCCI Naman Awards 2026) कार्यक्रमादरम्यान सॅमसनने एक किस्सा सांगितला. या कार्यक्रमात अंडर-19 वर्ल्ड कप विजेते भारतीय संघ तसेच आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूही उपस्थित होते. मंचावर हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी आले होते.  

वैभव सूर्यवंशीच्या IPL डेब्यूवेळी ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?

सॅमसन म्हणाला की, “राहुल सरांनी वैभवला बोलावलं आणि विचारलं, तुझा गेम प्लॅन काय आहे? त्यावर वैभव म्हणाला, ‘काही खास नाही सर… आता फक्त खेळणार.’ मग राहुल सर पुन्हा म्हणाले, ‘अरे, गेम प्लॅन काय आहे ते सांग.’ तेव्हा वैभव म्हणाला, ‘पहिल्याच चेंडूवर पहिला चान्स मिळाला तर उडवून टाकू...’ आणि मैदानात त्याने अगदी तसंच केलं. आम्हाला वाटलं हा तर वेगळंच व्हिडिओ गेम खेळतोय." सॅमसनने सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

वैभवची आवडती फिल्म अन् मोठं स्वप्न

या कार्यक्रमात वैभव सूर्यवंशीने स्वतःबद्दल काही रंजक गोष्टीही सांगितल्या. त्याने सांगितले की 2017 मध्ये त्याने स्टेडियममध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना पाहिला होता. तसेच त्याची आवडती फिल्म “धुरंधर” असल्याचेही त्याने सांगितले. याशिवाय त्याने मोठं स्वप्नही व्यक्त केलं. टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल याने केलेल्या 175 धावांच्या विक्रमाला मोडण्याची इच्छा असल्याचे वैभवने स्पष्ट केले.

अवघ्या 14व्या वर्षी IPL पदार्पण

वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये इतिहास रचला. तो केवळ 14 वर्षे 23 दिवसांचा असताना राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. मेगा लिलावात राजस्थानने त्याला 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

पदार्पणाच्या वेळीच त्याने आपली धमक दाखवली. क्रीजवर येताच शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर कव्हरच्या वरून जबरदस्त षटकार मारत त्याने खाते उघडले. यानंतर आयपीएल 2025 मध्ये त्याने आणखी एक मोठा विक्रम केला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ 38 चेंडूत 101 धावांची तुफानी खेळी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले.

हे ही वाचा -

Yash Dayal Married Shweta Pundir : अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या RCB खेळाडूने गुपचूप केले लग्न; कोण आहे यश दयालची बायको श्वेता पुंडीर?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget