एक्स्प्लोर

विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात संगणकाच्या मदतीनं हरवलं;झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामतची कबुली, नेटकऱ्यांचा संताप

झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या निखिल कामत सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झाला आहे. याचं कारण ठरलं आहे, विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि निखिल कामत यांच्यात रंगलेला बुद्धिबळाचा सामना.

मुंबई : बुद्धीबळातील पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) याच्यासोबतच्या प्रदर्शनीय सामन्यात उद्योजक निखिल कामत (Nikhil Kamath) यानं विजय मिळवल्यानंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्य वाटलं. पण हा विजय संगणक आणि इतरांच्या मदतीनं साधला होता अशी कबुली खुद्द निखिल कामतनं सोशल मीडियावर दिली आहे. निखिलनं दिलेल्या कबुलीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. बुद्धीबळ सामन्याच्या निकालात फेरफार केल्याप्रकरणी आणि खेळभावनेचा भंग केल्याप्रकरणी झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या निखिल कामतचं चेस-डॉट कॉमवरचं खातं बंद करण्यात आलं आहे. 

आनंद आणि कामत यांच्यातला ऑनलाईन सामना चेस-डॉट कॉमवरच झाला होता. या प्रकारानंतर निखिल कामतनं जाहीर माफीही मागितली आहे. निखिलनं आपण फेरफार केल्याची माहिती स्वतः ट्वीट करत दिली. 'एका बुद्धिबळ सामन्यात मी महान खेळाडू विश्वनाथन आनंदला पराभूत केले, असा अनेक जण विचार करत आहेत, पण ते हास्यास्पद आहे. हे म्हणजे उसेन बोल्टविरुद्ध 100 मीटरची शर्यत जिंकल्यासारखे आहे." असं निखिल कामतनं स्पष्ट केले.

पुढे बोलताना निखिल म्हणाला की, "लहान असताना आनंदशी चर्चा करण्याचे स्वप्न मी बाळगले होते. मदतनिधी उभारण्याकरिता आनंदशी काही सामने खेळण्याचे भाग्य मला लाभले. आनंदला पराभूत करताना मी संगणक, या खेळातील जाणकार तसेच अन्य गोष्टींची मदत घेतली. मदतनिधी सामना असल्याने फक्त मजा घेणे हा त्यामागील हेतू होता. पण यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे मी सर्वाची माफी मागतो." 

निखिल कामतनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदनही यासंदर्भात आपलं मत मांडलं, "बुद्धीबळाच्या पटावरील परिस्थितीप्रमाणे मी खेळत गेलो. प्रत्येकानेच तसे अनुकरण करावे, अशी अपेक्षा बाळगतो. लोकांसाठी मदतनिधी उभारण्याकरिता प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. खेळाच्या नीतिमूल्यांचे समर्थन करत हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता."

दरम्यान, झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या निखिल कामतवर सगळीकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अशातच बुद्धीबळ सामन्याच्या निकालात फेरफार केल्याप्रकरणी आणि खेळभावनेचा भंग केल्याप्रकरणी निखिल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget