एक्स्प्लोर
Advertisement
युवीने कॅन्सरला हरवलं होतं, आज फक्त इंग्लंडला हरवलं : सेहवाग
नवी दिल्ली : टीम इंडियाने कटकच्या दुसऱ्या वन डेत इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीने वैयक्तिक शतकांसह चौथ्या विकेटसाठी 256 धावांची भागीदारी रचून या सामन्यात भारताला सहा बाद 381 धावांची मजल मारून दिली होती.
टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने या सामन्यातील युवराजच्या खेळीचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. युवराजने कॅन्सरला हरवलं होतं, आज तर फक्त इग्लंडला हरवलंय. त्याच्याकडून सर्वांनी काही तरी शिकायला पाहिजे, युवी तुझा अभिमान वाटतो, असं वीरुने म्हटलं आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/822117061182758912
टीम इंडियाची या सामन्यात 27/3 अशी डळमळीत अवस्था झाली होती. त्यानंतर आलेल्या युवीने इनिंग सावरत मोठी खेळी केली. त्याने 127 चेंडूंमध्ये तब्बल 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 150 धावा ठोकल्या.
युवीची सर्वोच्च धावसंख्या
शतकानंतर सुसाट सुटलेल्या युवीने स्वत:च्या सर्वोच्च 139 धावांचा विक्रमही मोडला. युवीने 126 चेंडूत 150 धावा केल्या. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात वोक्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
संबंधित बातम्या :
भारताने कटक वन डेसह मालिकाही जिंकली!
सिलॅबसबाहेरचा केदार जाधव दुसऱ्या वन डेच्या केंद्रस्थानी
दुसरा वन डे : मालिका विजयासाठी विराट ब्रिगेड सज्ज
… म्हणून कटक वन डेत टीम इंडियाचा विजय निश्चित
केदारने आमचे सर्व डावपेच धुळीस मिळवले : मॉर्गन
केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली
पुण्यात ‘विराट’ सेनेपुढे सायबांवर संक्रांत, टीम इंडियाचा धमा’केदार’ विजय
भारताला मायदेशात हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी खेळी
क्रॅम्पमुळे केदार कोसळला, मात्र त्याचवेळी ड्रेसिंगरुममधून मेेसेज आला!
केदारला सांगितलं होतं, तू फक्त 150 पर्यंत साथ दे : कोहली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement