एक्स्प्लोर
Advertisement
म्हणून दिलदार योगेश्वर दत्तचा रौप्यपदक घेण्यास नकार
मुंबई : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा पैलवान योगेश्वर दत्तला रौप्यपदक मिळणार असल्याचं वृत्त मंगळवारी आलं. मात्र त्यानंतर काही तासातच योगेश्वरने दिलदारपणा दाखवत ते पदक दिवंगत पैलवान बेसिक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं असं म्हटलं आहे.
'खुदोखोज हा आपला चांगला मित्र होता, त्यामुळे त्याचं रौप्यपदक घेणं मला विचित्र वाटत आहे. लंडन ऑलिम्पिकपूर्वी दोन महिने मी रशियात प्रशिक्षण घेत होतो. त्यामुळे बेसिकशी माझी खूप छान ओळख झाली होती.' असं योगेश्वर दत्त म्हणतो. बुधवारी योगेश्वरने ट्वीट करत खुदोखोजच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दिवंगत मुलाचं पदक स्वतःजवळ ठेवावं, असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
https://twitter.com/DuttYogi/status/770876403424325633
'शक्य झाल्यास हे पदक खुदोखोजच्या कुटुंबीयांकडेच ठेवावं. त्यांचा योग्य तो सन्मान राखायला हवा. माणुसकी माझ्या दृष्टीने सर्वात मोठी आहे' 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटात रशियन खेळाडू बेसिक खुदोखोजला रौप्यपदक मिळालं होतं. मात्र खुदोखोज डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे.
https://twitter.com/DuttYogi/status/770876284721328129
2013 साली एका कार अपघातात खुदोखोजचा मृत्यू झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला. त्यामुळे त्याचं रौप्यपदक आता भारताच्या योगेश्वर दत्तला मिळणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमधून योगेश्वरला पहिल्याच फेरीत हार पत्कारुन रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलं होतं. मात्र आता लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यऐवजी रौप्यपदक मिळणार असल्याने योगेश्वरला हा सुखद धक्का आहे.
संबंधित बातम्या :
योगेश्वरला 2012 च्या ऑलिम्पिकचं कांस्यऐवजी रौप्यपदक मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement