एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WWE चे मालक मॅक्मोहन यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
मॅक्मोहन यांनी जानेवारी 2006 मध्ये किस आणि वाईट हेतून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप बोका रॅटनमधील टॅनिंग सलूनच्या महिला कर्मचाऱ्याने केला आहे.
न्यूयॉर्क : वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंटचे (डब्लूब्लूई) मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विन्स मॅक्मोहन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
मॅक्मोहन यांनी जानेवारी 2006 मध्ये किस आणि वाईट हेतून स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप बोका रॅटनमधील टॅनिंग सलूनच्या महिला कर्मचाऱ्याने केला आहे.
या प्रकरणात पोलिस मॅक्मोहन यांना अटक करुन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. पण पुराव्यांच्या अभावी गुन्हा दाखल झाला नाही. सबळ पुराव्यांशिवाय मॅक्मोहन यांना दोषी सिद्ध करु शकत नाही, त्यामुळे गुन्हा दाखल व्हायला हवा, असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे डब्लूडब्लूईच्या सीईओंनी महिलेचे आरोप फेटाळले आहेत.
संबंधित महिला घटनेच्या दिवशी मॅक्मोहन यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. तिच्या आरोपानुसार, "जानेवारी 2006 मध्ये मॅक्मोहन तंजाबार टॅनिंग सलूनमध्ये संध्याकाळी पाच वाजता आले होते. त्यावेळी ते 60 वर्षांचे असावेत. मॅक्मोहन यांनी महिलेला स्वत:चे न्यूड आणि सेमी न्यूड फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला.
"यानंतर मॅक्मोहन यांनी मला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. वेळी मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे, असंही त्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही," असा दावा महिलेने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement