एक्स्प्लोर

WTC 2021 1 Innings Highlight: :भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, न्यूझीलँडच्या जेमीसनच्या पाच विकेट्स  

भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या होत्या. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं  पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला.

WTC 2021 Live Updates : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये सुरु आहे.  पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर काल भारतानं तीन बाद 146 धावा केल्या होत्या. यात आज केवळ 71 धावांची भर टीम इंडियानं घातली.  भारताने दुसऱ्या दिवसअखेर 64.4 षटकात 3 विकेट्स गमावत 146 धावा केल्या होत्या. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं  पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला.  न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. 

आज भारतीय संघानं 3 बाद 146 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. विराट कालच्याच 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ धावा काढून  माघारी परतला. विराटनंतर  अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले. चांगली सुरुवात करणारा अश्विन 22 धावांवर बाद झाला.  

उपाहारानंतर जेमिसनने  इशांत शर्माला (4) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (0) लागोपाठ बाद केलं. शेवटी  ट्रेंट बोल्टने रवींद्र जाडेजाला (15) धावांवर बाद करत भारताचा डाव 217 धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. तर बोल्ट आणि वॅगनरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.  

कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस 'पाण्यात'!
साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला  जात आहे. मात्र पहिल्या दिवशी साऊदम्पटनमध्ये पाऊस झाल्यानं क्रीडा प्रेमींची निराशा झाली. पावसाच्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला. पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पावसाचे पाणी असल्याने सामना खेळला गेलाच नाही.पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता. 

टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात 
कोणता संघ या सामन्याचं जेतेपद पटकावेल आणि 'जगात भारी' ठरेल, असे प्रश्न अनेक क्रीडारसिकांच्या मनात घर करुन आहेत. हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्‍या 11 खेळाडूंची घोषणा केली.अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget