फायनलमध्ये कोण जाणार? भारत-ऑस्ट्रेलियात अटीतटीची लढत, पाहा A टू Z माहिती
Women T20 WC Semi-Final : महिला टी 20 विश्वचषक अंतिम टप्यात पोहचला आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी रंगणार आहे.
Women's T20 World Cup 2023 : महिला टी 20 विश्वचषक अंतिम टप्यात पोहचला आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ फायनलमध्ये पोहचणार आहे तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता त्यांच्यापुढे ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल.
कधी आणि कुठे पाहणार भारत-ऑस्ट्रेलिया सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर (Newlands Cricket Ground, Cape Town.) होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. सहा वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. त्याशिवाय एबीपी न्यूजवर तुम्ही अपडेट पाहू शकता.
पिच रिपोर्ट
महिला टी20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण, दुसऱ्या डावात फलंदाजीला खेळपट्टी मदत करेल.
हेड टू हेड -
हरमनप्रीतच्या टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं तगडे आव्हान असेल. याआधीचा रेकॉर्ड पाहिल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पारडे जड दिसतेय. दोन्ही संघ आतापर्यंत टी 20 मध्ये 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं तब्बल 22 वेळा विजय मिळवला आहे. तर भारताला सात सामन्यात विजय मिळवता आला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता.
कोण मारु शकतो बाजी ?
टी 20 मध्ये जेव्हा जेव्हा भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यात सामना रंगलाय, तेव्हा तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ झाल्याचं समोर आलेय. हा सामना त्रयस्त ठिकाणी असला तरीही येथील खेळपट्टी ऑस्ट्रेलियाला पोषक आहे. पण भारतीय संघ उलटफेर करण्यास माहिर आहे. अशातच हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडे जड मानले जातेय. पण भारतीय संघही विजयाचा दावेदार आहे.
संभावित प्लेइंग इलेवन ?
भारतीय महिला टीम – स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेनुका सिंह.
ऑस्ट्रेलिया महिला टीम – बेथ मूनी (विकेटकीपर), एलिस पेरी, मेग लेनिंग (कर्णधार), एश्ले गार्डनर, ताहलिया मैक्ग्रा, ग्रेस हैरिस, जॉर्जिया वेयरहेम, एनाबेल सदरलैंड, अलाना किंग, मेगन शूट, डार्सी ब्राउन.