NZ vs PAK : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, पहिला सेमीफायनल रंगणार सिडनीच्या मैदानात, कधी, कुठे पाहाल सामना?
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सेमीफायनल सामने खेळवले जात असून आता पहिला सेमीफायनलचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे.
T20 World Cup 2022 Match Live Streaming : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आता सुपर 12 चे सामने संपले असून सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ सेमीसमध्ये पोहोचले आहेत. आता या चार संघामध्ये दोन सेमीफायनलचे सामने खेळवले जाणार असून पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड तर दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात असणार आहे. दरम्यान पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीललंडमध्ये उद्या अर्थात 8 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे, तर या सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी होणार सामना?
भारतीय वेळेनुसार न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामनाऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कसे आहेत दोन्ही संघ?
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद
राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी.
न्यूझीलंडचा संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेवॉन कॉन्वे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.
सेमीफायनल सामन्यांवेळी पाऊस आला तर?
सेमीफायनल सामन्यांदरम्यान पावसाने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे पावसामुळे नियोजित सेमीफायनल आणि फायनलच्या दिवशी मॅचचा निकाल येऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 9 नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार असून जर या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पावसाने अडथळा निर्माण केला तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी पूर्ण केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा-