एक्स्प्लोर

NZ vs IRE : टीम साउदीनं रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत नावे केला मोठा रेकॉर्ड 

Tim Southee: न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने नुकत्याच झालेल्या  आयर्लंडविरुद्धत्या सामन्यात दोन विकेट्स घेत एक मोठा रेकॉर्ड नाववर केला आहे.

Tim Southee Record : न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टीम साउदीने (Tim Southee) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. साउदीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) आयर्लंड विरुद्ध न्यूझीलंड (IRE vs NZ) सामन्यात त्याने दोन विकेट्स घेत हा रेकॉर्ड नावावर केला आहे. साउदीने 104 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 128 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन याला मागे टाकत हा रेकॉर्ड नावावर केला आहे.

न्यूझीलंडनं नुकत्याच झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 35 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आधी दमदार फलंदाजी करत 185 धावा न्यूझीलंडने केल्या, त्यानंतर मात्र भेदक गोलंदाजी करत अवघ्या 150 धावांत आयर्लंडला रोखलं. यावेळी महत्त्वाची कामगिरी भारतीय गोलंदाजांनी केली असून स्टार अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याने सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्यात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला मागे टाकलं आहे. साउदीने आपल्या टी-20 कारकिर्दीत 104 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 128 विकेट्स आहेत. तसंच, शाकिब अल हसन त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने एकूण 108 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 127 विकेट्स आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  1. टीम साउदी (न्यूझीलंड) – 104 सामने– 128 विकेट्स
  2. शाकिब अल हसन (बांगलादेश) – 108 सामने– 127 विकेट्स
  3. राशिद खान (अफगाणिस्तान) – 73 सामने– 121 विकेट्स
  4. ईश सोढी (न्यूझीलंड) – 85 सामने– 109 विकेट्स
  5. लसिथ मलिंगा (श्रीलंका) – 84 सामने– 107 विकेट्स

न्यूझीलंड 35 धावांनी विजयी

वर्ल्डकपच्या 37 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं आयर्लंडचा (New Zealand vs Ireland) 35 धावांनी पराभव करत सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. या स्पर्धेत सेमीफायनलचं स्थान गाठणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात आयर्लंडसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 150 धावापर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात झंझावाती अर्धशतकीय खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) सामनीवीर म्हणून गौरवण्यात आलं.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Prakash Mahajan : भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...

व्हिडीओ

Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Prakash Mahajan : भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Tukaram Mundhe FDA: भेसळखोरांमध्ये तुकाराम मुंढेंची दहशत, एफडीएच्या कारवाईच्या भीतीने सगळ्या पेप्सी रस्त्यावर फेकून दिल्या
भेसळखोरांमध्ये तुकाराम मुंढेंची दहशत, एफडीएच्या कारवाईच्या भीतीने सगळ्या पेप्सी रस्त्यावर फेकून दिल्या
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Embed widget