IND vs ENG : ठरलं! भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, 'या' दिवशी रंगणार महामुकाबला
Team India in Semis : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत 5 पैकी 4 साखळी सामने जिंकत भारतानं दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे भारत आता ग्रुप 1 मधून दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाशी अर्थात इंग्लंडशी भिडणार आहे.
![IND vs ENG : ठरलं! भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, 'या' दिवशी रंगणार महामुकाबला T20 World Cup 2022 India will play against england in semifinal on 10th november at Adelaide Oval Adelaide IND vs ENG : ठरलं! भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, 'या' दिवशी रंगणार महामुकाबला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/c3ef1f591f34a2b8989867f560fc628a166773343057424_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतीय संघानं सेमीफायनल गाठली आहे. 5 पैकी 4 साखळी सामने जिंकत भारतानं दिमाखात सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. आता भारत हा ग्रुप 2 मधून सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचला असून त्यामुळे भारताची लढत ग्रुप 1 मधून दुसऱ्या क्रमांकावर सेमीफायनल गाठलेल्या अर्थात इंग्लंड संघाशी (IND vs ENG) असणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल मैदानात होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना होणार आहे.
दुसरीकडे भारताच्या ग्रुप 2 मधून पाकिस्ताननेही सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. पाकिस्ताननं बांग्लादेशवर 5 गडी राखून विजय मिळवल आणि 6 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे. विशेष म्हणजे नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी धक्कादायक मात देत स्पर्धेबाहेर केलं. त्यामुळे एक मोठा उलटफेर स्पर्धेत पाहायला मिळाला. ज्यामुळे सुरुवातीपासून दमदार खेळ दाखवूनही दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहचू शकला नाही. विशेष म्हणजे आता भारत-पाकिस्तान दोघेही सेमीफायनलमध्ये असल्याने फायनलमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 9 नोव्हेंबर रोजी असणार आहे.
साखळी सामन्यांअखेर गुणतालिकेची स्थिती?
ग्रुप 1
टीम |
सामने |
विजय |
पराभव |
गुण |
नेट रन रेट |
न्यूझीलंड(Q) |
5 |
3 |
1 |
7 |
+2.113 |
इंग्लंड(Q) |
5 |
3 |
1 |
7 |
+0.473 |
ऑस्ट्रेलिया |
5 |
3 |
1 |
7 |
-0.173 |
श्रीलंका |
5 |
2 |
3 |
4 |
-0.422 |
आयर्लंड |
5 |
1 |
3 |
3 |
-1.615 |
अफगाणिस्तान |
5 |
0 |
3 |
2 |
-0.571 |
ग्रुप 2
टीम |
सामने |
विजय |
पराभव |
गुण |
नेट रन रेट |
भारत(Q) |
5 |
4 |
1 |
8 |
+1.322 |
पाकिस्तान(Q) |
5 |
3 |
2 |
6 |
+1.028 |
दक्षिण आफ्रिका |
5 |
2 |
2 |
5 |
+0.874 |
नेदरलँड |
5 |
2 |
2 |
4 |
-0.849 |
बांगलादेश |
5 |
2 |
3 |
4 |
-1.176 |
झिम्बाब्वे |
5 |
1 |
3 |
3 |
-1.138 |
हे देखील पाहा-
Arshdeep Singh Life Story : वडील कॅनडाला पाठवत होते, पण गड्यानं एक वर्ष मागितलं आणि इतिहास घडवला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)