एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची 'लुका-छुपी', गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ झाला व्हायरल

Who is Trisha Kulkarni : श्रेयस अय्यरच्या गर्लंफ्रेंडचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. श्रेयस दिवाळी सेलिब्रेशनमध्येही याचं मिस्ट्री गर्लसोबत सहभागी झाला होता.

Shreyas Iyer & Mistry Girl : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकाच्या (World Cup 2023) मेगाफायनलचा मेगामुकाबला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागलं आहे. दरम्यान, एकीकडे विश्वचषकाचा माहौल पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यर सध्या चर्चेत आला आहे. श्रेयस अय्यर 'मिस्ट्री गर्ल'मुळे चर्चेत आला आहे. ही मुलगी श्रेयस अय्यरची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये या कथित गर्लफ्रेंडसोबत सामील झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

श्रेयस अय्यरसोबतची मिस्ट्री गर्ल कोण?

श्रेयस अय्यर भारतीय क्रिकेट संघाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये एका तरुणीसोबत दिसला. ही तरुणी श्रेयस अय्यरची गर्लफ्रेंड असून तो मागील काही काळापासून या तरुणीला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. टीम इंडियाच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये दोघेही मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसत आहेत.

दिवाळी पार्टीतील व्हिडीओ व्हायरल

श्रेयस अय्यरसोबत ज्या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्या तरुणीचं नाव त्रिशा कुलकर्णी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरील श्रेयस अय्यर संबंधित अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर श्रेयस अय्यर आणि त्रिशा कुलकर्णी यांचे काही जुने फोटो देखील समोर आले आहे. एका फोटोमध्ये श्रेयस आणि त्रिशा शार्दुल ठाकूरसोबत डिनर करताना दिसत आहेत. त्यामुळे श्रेयस आणि त्रिशाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Trisha Kulkarni (@iamtrishakulkarni)

त्रिशा कुलकर्णी लाइमलाइटपासून दूर राहते. इंस्टाग्रामवर त्याचे खाते खाजगी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही पण हे कपल रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात आहे. श्रेयस अय्यर त्रिशाला सोशल  फॉलो करतो, त्यासोबतच अय्यरची बहीण श्रेष्ठही त्रिशाला फॉलो करते.

अलीकडे त्रिशाही स्टेडियममध्ये दिसली आहे. एका फोटो ती टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिकासोबत बसलेली दिसत आहे. आता श्रेयस त्रिशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम कधी देणार हे पाहावं लागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget