एक्स्प्लोर

Rohit Sharma : लिटन दासची फटकेबाजी बघून नर्व्हस झाला होता कॅप्टन रोहित, म्हणाला भारताच्या विजयात 'ही' गोष्ट ठरली महत्त्वाची

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. भारत सामना जिंकला असला तरी अखेरपर्यंत सामना कोण जिंकेल हे सांगता येत नव्हतं.

IND vs BANG, Match Highlights : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात भारतानं 5 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत (T20 WC) दमदार पुनरागमन केलं आहे. ग्रुप 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत भारत सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. पण हा विजय भारताला सहजासहजी मिळाला नाही, अगदी रंगतदार झालेल्या आजच्या सामन्यात क्रिकेट रसिकच नाही तर खेळाडूही नर्व्हस झाले होते. कर्णधार रोहितनं सामन्यानंतर बोलताना तोही सामन्यात बराच नर्व्हस झाला असल्याचं सांगितलं.

बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेजंटेशनमध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ''सामन्यात मी शांत आणि नर्व्हसही होतो. हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, आम्ही आमच्या रणनीतीवर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात पावसानंतर बांगलादेशच्या 10 विकेट शिल्लक होत्या, त्यामुळे सामना दोन्ही बाजूने जाऊ शकला असता.'' हे बोलतना रोहितनं अर्शदीपचं खास कौतुक केलं. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत रोहितनं अर्शदीपचं तोंडभरुन कौतुक केलं. रोहितनं अर्शदीपसह विराट कोहली आणि केएल राहुलचंही कौतुक केलं.

भारताच्या विजयात 'ही' गोष्ट ठरली महत्त्वाची

भारताच्या विजयात महत्त्वाची गोष्टी टीम इंडियाची फिल्डींग ठरल्याचं रोहित शर्मा म्हणाला. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाबाबत रोहित शर्मा म्हणाला की, या सामन्यात आमची फिल्डींग उत्कृष्ट होती. आमच्या खेळाडूंनी महत्त्वपूर्ण सामन्यात उत्कृष्ट झेल घेतले, रनआऊट केले. मला संघाच्या क्षेत्ररक्षणावर कधीच शंका नव्हती. आमच्या विजयात उत्तम फिल्डींग महत्त्वाची ठरली.

भारताचा 5 धावांनी विजय

नाणेफेक जिंकून बांगलादेशनं पहिली गोलंदाजी घेतली. मग आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला. पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला. 

देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget