(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KL Rahul : आधी बॅड पॅच, नंतर दुखापत... दमदार खेळीनंतर केएल राहुलनं सांगितला कठीण काळातील अनुभव; ''गेल्या 6 महिन्यांचा काळ फार कठीण''
World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलनं 97 धावांची विजयी खेळी केली. यानंतर त्याने गेल्या सहा महिन्यातील अडचणींवर भाष्य केलं आहे.
KL Rahul Get Emotional : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडिया (Team India) च्या सलामी सामन्यात केएल राहुल (KL Rahul) ने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईच्या (Chennai) चेपॉक स्टेडिअम (Chepauk Stadium) वर भारताने विश्वचषक 2023 ची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजी पुढे कांगारूंनी गुडघे टेकले. केएल राहुलने 97 धावांची विजयी खेळी केली. यामुळे तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला. दमदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या केएल राहुलने दुखापतीच्या काळातील संघर्षावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
केएल राहुलची 97 धावांची विजयी खेळी
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाचा अवघ्या 199 धावांनी पराभव केला होता. भारताने 200 धावांचं लक्ष्य 41.2 षटकांत चार विकेट गमावून पूर्ण केलं आणि विजय मिळवला. दुखापतीतून सावरल्यानं केएल राहुल दमदर फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केल्यानंतर केएल राहुलने गेल्या काही महिन्यांतील त्याच्या संघर्षाबाबत सांगितलं आहे.
केएल राहुलनं सांगितला त्रासदायक अनुभव
केएल राहुलने त्याचा बॅड पॅच आणि दुखापतीच्या काळातील अनुभव सांगितला. त्याने सांगितलं की, त्यांच्या खराब फॉर्मच्या वेळी अनेकांनी त्याच्यावर टीका केली. आयपीएल 2023 मध्ये दुखापतीमुळेही त्याला मैदानापासून बराच काळ दूर राहावं लागलं.
KL Rahul said, "there was a time when I was getting a lot of criticism and trolls. That was very painful and then I got injured in the IPL, came to know I needed 5-6 months to recover. It was a tough time, but glad to recover". pic.twitter.com/6zFfmKoVkh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 9, 2023
''गेल्या 6 महिन्यांचा काळ फार कठीण''
केल राहुलने मॅचनंतर स्टार स्पोटर्सशी बोलताना सांगितलं की, "एक काळ असा होता जेव्हा माझ्यावर खूप टीका झाली आणि ट्रोलही करण्यात आलं. तो काळ खूप वेदनादायी होता. त्यानंतर मी आयपीएलमध्ये जखमी झालो. मला समजलं की दुखापतीतून बरे होण्यासाठी पाच ते सहा महिने लागतील. तो कठीण काळ होता, या काळात खूप त्रास सहन करावा लागला."
सलामीवीर ते मधल्या फळीतील फलंदाज, मग यष्टिरक्षक
केएल राहुलने संघासाठी सलामीवीर स्थानाचं बलिदान दिलं. केएल राहुल सलामीवीर होता पण टीम इंडियाकडे मधल्या फळीत एकही चांगला फलंदाज नसल्यामुळे राहुलला ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर तो ती जबाबदारी पार पाडत आहे. याशिवाय ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर राहुल संघाच्या यष्टिरक्षकाची (Wicket Keeper) जबाबदारीही पार पाडत आहे. संपूर्ण विश्वचषकात तो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :