एक्स्प्लोर

IND vs BAN : टी20 क्रिकेटमध्ये 11 वेळा भारत-बांग्लादेश आमने-सामने, 'हे' 10 खास रेकॉर्ड माहित आहेत का?

T20 WC 2022 Stats : भारतीय संघ बुधवारी बांग्लादेश संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी भारताला हा विजय मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

India vs Bangladesh, T20 World Cup : भारतीय संघ (Team India) टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) आता बांग्लादेशविरुद्ध (India vs Bangladesh) मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेडच्या मैदानावर उद्या अर्थात 2 नोव्हेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान विश्वचषकात पुढील फेरीत एन्ट्रीसाठी दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे याआधी या दोन संघांमध्ये 11 टी20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 10 सामने जिंकले असून बांग्लादेशचा केवळ एकदा विजय झाला आहे. तर आता विश्वचषकात होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघ आमने-सामने आले असतानाचे काही खास रेकॉर्ड्स पाहू...

  1. सर्वाधिक धावसंख्या : टीम इंडियाने 6 जून 2009 रोजी बांग्लादेशविरुद्ध 5 विकेट्स गमावत 180 रन केले होते. 
  2. सर्वात कमी धावसंख्या : मीरपुर येथे 24 फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा संपूर्ण संघ 121 रनवर ऑलआऊट झाला होता.
  3. सर्वात मोठा विजय : टीम इंडियाने फेब्रुवारी 2016 मध्ये मीरपूर T20 मध्ये बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. तर मार्च 2014 मध्ये भारताने बांग्लादेशचा 8 गडी राखून पराभव केला होता. विकेट्सच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. 
  4. सर्वाधिक धावा: रोहित शर्माने बांग्लादेशविरुद्ध टी-20 मध्ये 452 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 41.09 आणि स्ट्राईक रेट 144.40 आहे.
  5. सर्वोत्तम खेळी: रोहित शर्माने मार्च 2018 मध्ये कोलंबो येथे झालेल्या T20 सामन्यात 61 चेंडूत 89 धावा केल्या होत्या.
  6. सर्वाधिक 50+ धावा: हा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. हिटमॅनने बांग्लादेशविरुद्ध टी20 मध्ये 5 वेळा 50+ धावा केल्या आहेत.
  7. सर्वाधिक षटकार: रोहित शर्माने बांग्लादेशविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये 21 षटकार ठोकले आहेत.
  8. सर्वाधिक विकेट्स: युजवेंद्र चहलने भारत-बांग्लादेश सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी 17 आणि इकॉनॉमी रेट 6.37 होता.
  9. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: दीपक चाहरने नोव्हेंबर 2019 मध्ये नागपूर T20 मध्ये 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
  10. सर्वोत्तम विकेटकिंपिंग: एमएस धोनीने 5 सामन्यात 7 बळी यष्टीरक्षक म्हणून घेतले आहेत. त्याने 3 झेल आणि 4 स्टंपिंग केले आहेत.

हे देखील वाचा-

IND vs BAN : बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण पाऊस व्यत्यय आणणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Embed widget