IND vs ZIM: सूर्यकुमारच्या तडाखेबाज फलंदाजीनं रोहित शर्मा भलताच खूश, झिम्बाब्वेविरुद्ध विजयानंतर म्हणाला...
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा (IND vs ZIM) 71 धावांनी धुव्वा उडवला.
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा (IND vs ZIM) 71 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं या विजयासह भारतीय संघ गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल ठरला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) सेमीफायनल सामना खेळणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना खेळला जाईल. दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या विजयात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं मोलाचा वाटा उचललाय. त्यानं अवघ्या 25 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी. झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं सूर्यकुमारच्या कामगिरीचं कौतूक केलंय.
ट्वीट-
A quick-fire half-century for @surya_14kumar off 23 deliveries.
— BCCI (@BCCI) November 6, 2022
This is his 12th FIFTY in T20Is.
Live - https://t.co/lWOa4COtk9 #INDvZIM #T20WorldCup pic.twitter.com/KgSARK034S
रोहितकडून सूर्यकुमार यादवचं कौतूक
रोहित शर्मा म्हणाला की, आमच्या संघानं चांगली कामगिरी केली. फलंदाजांसह गोलंदाजांनीही सर्वोत्तम खेळाचे दर्शन घडवलं. झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यापूर्वी आम्ही सेमीफायनलसाठी पात्र ठरलो होतो. पण आमचा प्रयत्न मैदानावर चांगली कामगिरी करण्याचा होता. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीनं फलंदाजी करत आहे,ते अविश्वसनीय आहे. सूर्या जबाबदारीनं खेळत आहे. तो सातत्यानं चांगली कामगिरी करत इतर फलंदाजांचं दडपणही कमी करत आहे. हे आमच्या संघासाठी खूप महत्त्वाचं आहे.
इग्लंडविरुद्ध सामन्यापूर्वी रोहित म्हणतोय...
टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मानं मोठं वक्तव्य केलं आहे. "या सामन्यात परिस्थितीनुसार खेळणं महत्वाचं असेल. अॅडिलेडमध्ये आम्ही सामने खेळले आहेत. पण इंग्लंडच्या संघाचं आमच्यासमोर वेगळं आव्हान असेल", असंही रोहित शर्मा म्हणाला आहे. याचबरोबर भारताच्या टी-20 विश्वचषकातील प्रवासात चाहत्यांचंही मोलाचं योगदान असल्याचं रोहितनं म्हटलंय.
भारताचा झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय
टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात झिम्ब्बाब्वेचा संघ 115 धावांवर गारद झाला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सूर्यकुमार यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-