IND vs SA, T20 WC LIVE : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय, 5 गडी राखून दिली मात
T20 WC 2022, Match 30, IND vs SA : टी20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केल्यानंतर आज भारतासमोर दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असणार आहे.
LIVE
Background
IND vs SA Match Live Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघासाठी सेमीफायनलच्या शर्यतीत अव्वल येण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतानं स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांनी केली आहे. आधी पाकिस्तानवर 4 विकेट्सनी आणि मग नेदरलँड्सवर 56 धावांनी विजय मिळवला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना अनिर्णीत सुटला तर बांग्लादेशला त्यांनी तब्बल 104 धावांनी मात दिली. त्यामुळे स्पर्धेतील दोघा बलाढ्य संघामध्ये आज एक रंगतदार सामना रंगणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 13 सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेनं नऊ सामन्यात बाजी मारली आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरला आहे. सध्याची आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-20 मालिकाही जिंकली होती. सध्या भारत आण दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघातील टॉप ऑर्डर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताची वेगवान गोलंदाजीही अप्रतिम आहे. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेचा टॉप ऑर्डरही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. क्विंटन डी कॉक आणि रिली रोसो आक्रमक खेळी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही विरुद्ध संघातील फलंदाजाच्या नाकी नऊ आणले आहेत. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा १०४ धावांनी पराभव केला.
विश्वचषकासाठी कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल , युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ-
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नार्खिया, तबरेझ शाम्सी, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन, रीझा हेंड्रिक्स.
हे देखील वाचा -