IND vs ENG: पुन्हा केएल राहुल- रोहित शर्माची सलामी जोडी फ्लॉप, सूर्याही स्वस्तात बाद
T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्याात आज टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय.
T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्याात आज टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यातही भारताची सलामी जोडी केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. त्यानंतर भारताची सर्वात मोठी आशा सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात भारतानं निर्धारित 20 षटकात सहा विकेट्स गमावून इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. दरम्यान, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं अर्धशतकीय खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.
अॅडिलेडच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात केएल राहुल पाच चेंडूत पाच धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा मोठी धावसंख्या उभारेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यानंही चाहत्यांना निराश केलं. रोहितनं 28 चेंडूत 27 धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध सामन्यातही भारताची सलामी जोडी फ्लॉप ठरल्यानं सोशल मीडियावर रोहित शर्मा- केएल राहुलला ट्रोल केलं जातंय. या स्पर्धेत रोहित शर्मानं सहा सामन्यात एकूण 116 धावा केल्या आहेत. तर, केएल राहुलनं तितक्याच सामन्यात अवघ्या 128 धावांची खेळी केलीय.
सूर्याची निराशाजनक खेळी
रोहित शर्मा, केएल राहुलला स्वस्तात माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव भारताची सर्वात मोठी अपेक्षा होती. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवनं सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. याच कामगिरीच्या जोरावर त्यानं आयसीसी टी-20 रँकींगमधील अव्वल स्थान मिळवलं होतं. मात्र, इंग्लंडविरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादव पूर्णपणे अपयशी ठरला. या सामन्यात त्यानं 10 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. आदील राशीदच्या चेंडूवर मोठ्या शॉट खेळण्याचा प्रयत्नात सूर्या आऊट झाला.
संघ-
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:
जोस बटलर (कर्णधार/विकेटकिपर), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-