IND vs PAK, Head to Head : भारत-पाकिस्तान टी20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?
IND vs PAK T20 : भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध सामन्याने करत आहे. दरम्यान या महामुकाबल्याआधी दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास कसा आहे यावर एक नजर फिरवू...
![IND vs PAK, Head to Head : भारत-पाकिस्तान टी20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास? In India vs Pakistan t20 know Head to Head Record before T20 World Cup 2022 match IND vs PAK, Head to Head : भारत-पाकिस्तान टी20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/f94178c3e3984c92a678464b67dab44f1666456672951581_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Pakistan, T20 Record : भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज महामुकाबला रंगणार आहे. टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील दोन्ही संघाचा पहिलाच सामना असून दोघेही आज विजयासाठी शर्थीचे प्रयत्न नक्कीच करतील. दरम्यान आजवरच्या इतिहासात भारतानं पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं असलं तरी मागील काही वर्षात पाकिस्तानचा संघ दमदार फॉर्मात दिसत आहे. 2017 ची चॅम्पिन्स ट्रॉफी त्यानंतर 2021 चा टी20 वर्ल्डकपमधील सामना या पराभवानंतर आशिया कपमध्येही दोन पैकी एका सामन्यात भारत पराभूत झाला, त्यामुळे आजही सामना रंगतदार होऊन कोण जिंकेल? याकडे सर्वाचे लक्ष आहे. तर या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला 3 सामने जिंकता आले आहेत.
कसे आहेत टी20 विश्वचषक 2022 साठी दोन्ही संघ?
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी , शान मसूद
राखीव खेळाडू : उस्मान कादिर, मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी.
अशी असू शकते भारताची अंतिम 11सलामीवीर - रोहित शर्मा, केएल राहुल
मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक,
ऑलराउंडर- अक्षर पटेल
गोलंदाज - अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)