IND vs NED, Pitch Report : सिडनीच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध नेदरलँड सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?
IND vs NED T20 : पाकिस्तानविरुद्ध विजयाने वर्ल्डकपची सुरुवा केल्यानंतर आज भारतासमोर नेदरलँड संघाचं आव्हान असणार आहे.
IND vs NED, Pitch Report : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आज भारतासमोर नेदरलँडचं (India vs Netherland) आव्हान असणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. भारताने आधी पाकिस्तानला मात देत ग्रुपमध्ये आघाडी घेतली आहे. पण नेटरनरेट वाढवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.
सामना होणाऱ्या सिडनी क्रिकेट ग्राउंडची खेळपट्टी फलंदाजांसाठी अगदी उत्तम आहे. त्यामुळे जलदगतीने धावा करण्याची संधी फलंदाजांना आहे. त्यात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी फारशी मदत देत नाही, परंतु मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू कमाल करु शकतात. नाणेफेक जिंकणाऱ्या संघासाठी हवा तो निर्णय घेण्याची संधी असल्याने आज नाणेफेकही महत्त्वाची असेल.
भारतासाठी विजय महत्त्वाचा
सामना होणाऱ्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडलर 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता Weather.com ने दिली आहे. तसंच टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर भारत आणि नेदरलँड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण वाटून दिला जाईल. ज्यानंतर भारताच्या खात्यावर पाकिस्तानविरुद्धच्या 2 गुणांसह एकूण 3 गुण होतील. मग भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकावा लागेल, ज्यानंतरच भारत आपली आघाडी कायम ठेवेल,त्यात पाकिस्तान संघही चांगल्या फॉर्मात असल्याने त्यांनी भारतानंतर उर्वरीत संघावर विजय मिळवल्यास आजच्या अनिर्णीत सामन्यामुळे भारताला एक गुण कमीच राहिल आणि पाकिस्तान पुढे जाऊ शकतो. या सर्वामध्ये पुढे जाऊन नेट रनरेटही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यात नेदरलँडचा संघ खास फॉर्मात नसल्याने भारताच्या विजयाच्या अपेक्षा आज अधिक आहेत, त्यामुळे पावसाने व्यत्यय आणता कामा नये, अशी प्रार्थना भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
नेदरलँड्सचा संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, टिम व्हॅन डर गुगटेन , स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, ब्रॅंडन ग्लोव्हर.