England T20 WC Squad : टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, जेसन रॉयसह जोफ्रा आर्चरलाही संधी नाही
T20 World Cup 2022 : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी20 विश्वचषक सुरु होण्यासाठी अजून बराच कालावधी असताना संघाची घोषणार केली आहे. जोस बटलरकडे संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं आहे.
England Squad for T20 WC 2022 : ऑक्टोबरमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु होणार आहे. त्यापूर्वीच इंग्लंड (England) क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी संघाचा कर्णधार म्हणून जोस बटलरकडे (Jos Buttler) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे संघाचा आघाडीचा सलामीवीर जेसन रॉय आणि एलेक्स हाल यांच्यासारखे खेळाडू संघात नसून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) देखील पूर्णपणे दुखापतीतूबन सावरला नसल्याने त्याचं नाव देखील संघात नसल्याचं समोर आलं आहे.
इंग्लंडने विश्वचषकासाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यावेळी दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश संघात केला आहे. यासोबतच दोन अष्टपैलू खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
असा आहे इंग्लंडचा T20 विश्वचषक संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करॉन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली , ख्रिस वोक्स, मार्क वुड
Squad 🙌 #T20WorldCup 🏏 🌏 🏆 pic.twitter.com/k539Gzd5Ka
— England Cricket (@englandcricket) September 2, 2022
यासोबतच इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंड संघाचीही घोषणा केली आहे. इंग्लंड संघ 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तानविरुद्ध 7 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. यासाठी 19 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विश्वचषक संघात ख्रिस जॉर्डन आणि लियाम लिव्हिंगस्टोनचा समावेश नाही. या वेळी झालेल्या दुखापतींमुळे हे दोन्ही खेळाडू त्यांच्या पुनर्वसन योजनेवर काम करतील. इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्यासाठी संघात 5 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे.
पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करॉन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, जॉर्डन कॉक्स , बेन डकेट, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन, टॉम हेल्म, विल जॅक, ल्यूक वुड.
We've named our squad for our seven-match T20 tour to Pakistan! 🏏
— England Cricket (@englandcricket) September 2, 2022
🇵🇰 #PAKvENG 🏴
हे देखील वाचा-