(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SL vs BAN, Asia Cup 2022: बांगलादेशचं आव्हान संपुष्टात! नो बॉल, मिसफील्डिंगसह या '5' चुका पडल्या भारी
SL vs BAN, Asia Cup 2022: दुबई आंतराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) काल खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा (Sri Lanka vs Bangladesh) दारुण पराभव केला.
SL vs BAN, Asia Cup 2022: दुबई आंतराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) काल खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील पाचव्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा (Sri Lanka vs Bangladesh) दारुण पराभव केला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये एन्ट्री केलीय. तर, बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. श्रीलंकेसमोर 183 धावांचं लक्ष्य ठेवणाऱ्या बांगलादेशचा संघाचा विजय जवळपास निश्चित झाला होता. मात्र, गोलंदाजीदरम्यान बांगलादेशनं अनेक चुका केल्या. ज्यामुळं त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
बांगलादेशच्या पराभवाची पाच मोठी कारण-
1) नो बॉल्स
कुसल मेंडिस 29 धावांवर खेळत असताना बांगलादेशचा फिरकीपटू मेहदी हसननं बाद केलं. पण दुर्दैवानं हा चेंडू 'नो बॉल' ठरला. त्यानंतर कुसल मेंडिसनं 37 चेंडूत 60 धावा केल्या. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अधिक महत्त्वाच्या प्रसंगी नो बॉल टाकले. श्रीलंकेला विजयासाठी 10 चेंडूत 21 धावांची गरज असताना इबादत हुसेननं नो बॉल टाकला आणि त्यावर 5 धावा मिळाल्या. फ्री हिटवरही श्रीलंकेच्या फलंदाजांनी 2 धावा घेतल्या. एवढेच नाही तर 4 चेंडूत विजयासाठी 3 धावांची गरज असतानाही बंगाली गोलंदाज मेहदी हसनने 'नो बॉल' टाकून श्रीलंकेच्या विजयाचा मार्ग सोपा केला.
2) अतिरिक्त 17 धावा
या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी 17 अतिरिक्त धावा खर्च केल्या. नो बॉल्ससोबतच बरेच वाईड बॉलही टाकले गेले. बांगला गोलंदाजांनी एकूण 8 चेंडू वाईड टाकले. या अतिरिक्त धावा बांगलादेशला भारी पडल्या.
3) खराब फिल्डिंग
या सामन्याच्या दुसऱ्या षटकात मुशफिकुर रहीमनं कुशल मेंडिसचा झेल सोडला. त्यावेळी कुशल मेंडिस एक धाव करून क्रिजवर उभा होता. त्यानंतर मेंडिसनं श्रीलंकेसाठी महत्वाच्या सामन्यात 60 धावांचं योगदान देत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याचप्रमाणं त्याला धावबाद करण्याची संधीही गमावली
4) एका खेळाडूला चार जीवनदान
आशिया चषकातील बांगलादेशविरुद्ध करो या मरो च्या सामन्यात कुशल मेंडिसनं 37 चेंडूत 60 धावा केल्या. श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाट उचणाऱ्या कुशल मेंडिसला सामानावीर म्हणून गौरविण्यात आलं. मात्र मेंडिसच्या या खेळीला बांगलादेशचे खेळाडू जबाबदार आहे. मेंडिस एक धावावर असताना त्याचा झेल सुटला, तो 27 धावांवर असताना तो ज्या चेंडूवर बाद झाला तो 'नो बॉल' होता. यानंतर पुढच्याच षटकात तो स्पष्टपणे झेलबाद झाल्याचे दिसत होते. पण तरीही बांगलादेशच्या संघानं रिव्ह्यू घेतला नाही.सामनाच्या शेवटी बांगलादेश संघानं त्यांना धावबाद करण्याची संधीही गमावली.
5) 19 व्या षटकात खराब गोलंदाजी
या सामन्यात बऱ्याच चुका केल्यानंतरही बांगलादेश संघ हा सामना जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण सामन्याच्या 19 व्या षटकात सामना श्रीलंकेच्या बाजूनं झुकला.श्रीलंकेला विजयासाठी 12 चेंडूत 25 धावांची गरज असताना इबादत हुसेननं 19 व्या षटकात 17 धावा दिल्या. हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले.
हे देखील वाचा-