IND vs ENG: इंग्लंडची ताकद वाढणार! स्टार ऑलराऊंडरची संघात एन्ट्री, भारताविरुद्ध घेतलेत सर्वाधिक विकेट्स
T20 World Cup semifinal 2: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे.
T20 World Cup semifinal 2: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात आज टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अॅडिलेट ओव्हल मैदानावर (Adelaide Oval) खेळला जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) दुखापतीमुळं भारताविरुद्ध सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याऐवजी संघाचा स्टार ऑलराऊंडर क्रिस जॉर्डनला (Chris Jordan) संधी दिली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत मार्क वूडनं चांगली कामगिरी बजावलीय. यातच त्याचं संघाबाहेर होणं इंग्लंडच्या संघासाठी मोठा धक्का असेल.
टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार जॉर्डन
यंदाच्या टी-20 विश्वचषकात क्रिस जॉर्डननं एकही सामना खेळला नाही. भारताविरुद्ध त्याचा टी-20 विश्वचषकातील पहिला सामना असेल. जॉर्डननं त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात क्रिस जॉर्डननं जबरदस्त गोलंदाजी केली होती. परंतु, भारताविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सेमीफानयलमध्ये क्रिस जॉर्डन कशी कामगिरी बजावतोय? हे पाहणं महत्वाचं ठरेल. इंग्लंडच्या प्रॅक्सिस सेशनदरम्यान क्रिस जॉर्डन दिसला होता.
भारताविरुद्ध दमदार कामगिरी
जॉर्डन हा इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याची आकडेवारी चांगली आहे. जॉर्डननं भारताविरुद्ध खेळलेल्या 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. त्याचे हे आकडे भारतीय संघासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेतील मार्क वूडचं प्रदर्शन
या टी-20 विश्वचषकात मार्क वुडनं जबरदस्त कामगिरी बजावली. त्यानं आपल्या वेगवान गोलंदाजीनं फलंदाजांना अडचणीत आणल्याचं आपण पाहिलंय. वुडनं यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या चार डावात 12 च्या सरासरीनं आणि 7.71 च्या इकोनॉमी रेटनं 9 विकेट्स घेतल्या आहेत.
संघ-
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:
जोस बटलर (कर्णधार/विकेटकिपर), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-