Axar Patel Run Out : विराटनं ऐनवेळी रन कॅन्सल केला अन् अक्षर पटेल धावचीत, भारताची पाकिस्तानविरुद्ध खराब सुरुवात
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानला 159 धावांमध्ये रोखलं आहे.
IND vs PAK, Axar Patel runout : भारतीय संघ 160 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी (IND vs PAK) मैदानात आला असताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. सलामीवीरांसह एकूण 4 फलंदाज अत्यंत स्वस्तात माघारी परतले. यावेळी चौथा विकेट अक्षर पटेलचा रनआऊटच्या रुपात गेला. यावेळी विराट कोहली आणि अक्षर फलंदाजी करत असताना आधी रन घेतल्यानंतर एनवेळी विराटने रन कॅन्सल केला आणि अक्षर पटेल धावचीत झाला. या धावचीत होण्यानंतर भारताचे 31 वर 4 गडी बाद झाले. अक्षर बाद झाल्यावर त्याचा रनआऊटचा व्हिडीओ तसच काही मीम्स व्हायरल होत आहेत.
भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली आहे. सलामवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी 4 रन करुन बाद झाले आहेत. त्यानंतर सूर्यकुमारने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 15 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर अक्षरही 2 रन करुन रनआऊट झाला.
Run out by Babar Azam 🏏
— VPNSports (@VPNSports) October 23, 2022
Axar Patel 2 (3) #INDvsPAK pic.twitter.com/pQXH2jW56t
Axar Patel pic.twitter.com/qxr1K5c3yd
— Delhi Se Hoon BC (@delhichatter) October 23, 2022
हे देखील वाचा-