AUS vs SL: मार्कस स्टॉयनिसचं झंझावाती अर्धशतक; ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर सात विकेट्सनं विजय
ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्कस स्टॉयनिसनं मोलाचा वाटा उचलला. त्यानं अवघ्या 18 चेंडूत नाबाद 59 धावांची वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला निसटता विजय मिळवून दिला.
T20 World Cup 2022: मार्कस स्टॉइनिसच्या (Marcus Stoinis) झंझावाती अर्धशतकामुळं गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं मंगळवारी पर्थ स्टेडियमवर (Perth Stadium) खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा (AUS vs SL) सात विकेट्स राखून पराभव केलाय. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्कस स्टॉयनिसनं मोलाचा वाटा उचलला. त्यानं अवघ्या 18 चेंडूत नाबाद 59 धावांची वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला टी-20 विश्वचषकातील पहिला विजय मिळवून दिला.
ट्वीट-
Absolute carnage 💥
— ICC (@ICC) October 25, 2022
For his stunning innings of 59* off just 18 balls, Marcus Stoinis is the @aramco Player of the Match 🔥 pic.twitter.com/EdIx0jfsoR
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर सात विकेट्स राखून विजय
या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाला निर्धारित 20 षटकात 157 धावांवर रोखलं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघानं सात विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात मार्कस स्टॉयनिसनं तुफानी अर्धशतक ठोकलं. याशिवाय, ग्लेन मॅक्सवेलनंही 12 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 23 धावांची खेळी केली. कर्णधार आरोन फिंचनं 31 चेंडूत 42 आणि मिचेल मार्शनं 17 धावांचं योगदान दिलं. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला 11 धावांची खेळी करता आली.
वानिंदू हसरंगाची खराब गोलंदाजी
श्रीलंकेचा मुख्य गोलंदाज वानिंदू हसरंगानं खराब गोलंदाजी केली. त्यानं तीन षटकात एकही विकेट्स न घेता 53 धावा खर्च केल्या, जो त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा स्पेल ठरला. तर, धनंजय डिसिल्वा, महेश तिक्षणा आणि चमिका करुणारत्ने यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवता आली.
ट्वीट-
The joint-second-fastest fifty in the men's T20 World Cup 💥
— ICC (@ICC) October 25, 2022
Outstanding innings from Marcus Stoinis 🙌🏻#AUSvSL | #T20WorldCup pic.twitter.com/rRIHMeooVw
टी-20 विशचषकातील दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक
टी-20 विश्वचषकातील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. या यादीत भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज युवराज सिंह अजूनही टॉपवर आहे. त्यानं 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
हे देखील वाचा-