Pakistan Cricket Team : अफगाणिस्तानच्या दणक्यानंतर पाकिस्तान टीममध्ये भूकंप; बाबर आझम एकाकी, 'या' तिघांचा 'बळीचा बकरा' होणार!
Pakistan Cricket Team : संपूर्ण दोष बाबर आझम आणि मुख्य निवडकर्ते इंझमाम-उल-हक यांच्यावर टाकण्याची तयारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वक्तव्यात स्पष्टपणे दिसून येते.
Pakistan Cricket Team : अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अभूतपूर्व भूकंप झाला आहे. सलग तीन सामने गमावून वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर असलेल्या संघात फूट पडली आहे. कर्णधार बाबर आझम एकाकी पडला आहे. ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडले आहे. बाबर आझम आणि शाहीन शाह यांच्यातील नात्याची चर्चा सुरू झाली आहे. विश्वचषकानंतर बाबरला कर्णधारपद गमवावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
PCB urges cricket fraternity to support Pakistan Team
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 26, 2023
Read more ⤵️ https://t.co/yoJtz7MHBe
बाबर आझमच्या बचावात्मक डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित
त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मीडिया रिलीझमध्येही हे सूचित करण्यात आले आहे. संपूर्ण दोष बाबर आझम आणि मुख्य निवडकर्ते इंझमाम-उल-हक यांच्यावर टाकण्याची तयारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वक्तव्यात स्पष्टपणे दिसून येते. बाबरच्या कर्णधारपदाच्या निर्णयांवर मैदानाबाहेर जोरदार टीका होत आहे. वसीम अक्रम, शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह-उल-हक यांच्यासह पाकिस्तानच्या अनेक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्याच्या बचावात्मक डावपेचांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संघ पुन्हा संघटित होईल
ICC विश्वचषक 2023 मध्ये राष्ट्रीय संघाकडून झालेल्या सलग तीन पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेट चाहत्यांच्या भावनांचा स्वीकार केला आहे. या आव्हानात्मक वातावरणात कर्णधार बाबर आझम आणि संपूर्ण संघाला पाठिंबा देत राहतील, अशी आशा बोर्डाला आहे. राष्ट्रीय संघाचे राऊंड-रॉबिन टप्प्यात अजूनही चार महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. पीसीबीला आशा आहे की संघ पुन्हा संघटित होईल, अपयशातून सावरेल आणि पुढील सामन्यांमध्ये सकारात्मक आणि प्रभावी कामगिरी करेल. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे.
कर्णधार बाबर आझम आणि मुख्य निवडकर्ते इंझमाम-उल-हक यांना या विश्वचषकात संघ बनवण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. भविष्याकडे पाहता, विश्वचषकातील संघाच्या कामगिरीच्या आधारे बोर्ड पाकिस्तान क्रिकेटच्या हिताचा निर्णय घेईल. सध्या पीसीबीने सर्व चाहते आणि माजी खेळाडूंनी संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानला शुक्रवारी चेन्नईत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. जर पाकिस्तान येथे पराभूत झाला तर सहा सामन्यांमधला हा त्याचा सलग चौथा पराभव ठरेल आणि उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता खूपच कमी होईल. सध्या संघ निगेटिव्ह नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या