एक्स्प्लोर
World Cup 2019 : मी तर धोनीचा 'फर्स्ट एड किट' : दिनेश कार्तिक
पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचा समावेश झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला. स्वतः कार्तिकलादेखील यामुळे आश्चर्य वाटले होते.
मुंबई : पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचा समावेश झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला. स्वतः कार्तिकलादेखील यामुळे आश्चर्य वाटले होते. संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर आहे, तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन.
कार्तिक म्हणाला की, माझी विश्वचषकासाठी संघात निवड झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. परंतु संघातील माझ्या रोलबाबत मी म्हणेन की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर खेळतोय तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन. कोणत्याही कारणामुळे धोनीला एखादा सामना खेळता आला नाही, तर त्याच्या जागी मला संधी मिळेल. त्या एका दिवसासाठी मी संघात बॅन्ड एडची भूमिका निभावेन.
विश्वचषकासाठीच्या संघात अंतिम 15 जणांच्या यादीतले कार्तिकचे नाव अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. विश्वचषक संघात आपले नाव असेल, याचा अंदाज स्वतः कार्तिकलाही नव्हता. महेंद्रसिंह धोनीसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून गेल्या काही मालिकांमध्ये रिषभ पंतला संधी मिळत होती. त्यामुळे त्याजागी यष्टीरक्षक म्हणून पंतचीच निवड होईल, असे मत अनेकांनी मांडले होते. परंतु ही सर्व मतं चुकीची ठरवत निवड समितीने कार्तिकची निवड केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement