एक्स्प्लोर
वेस्ट इंडिजचा क्रिकेटर इंग्लंडच्या संघाकडून खेळणार!
इंग्लंडच्या संघाकडून आतापर्यंत अनेक परदेशी खेळाडू क्रिकेट खेळले आहेत. आता त्यामध्ये अजून एकाची भर पडणार आहे.

मुंबई : इंग्लंडच्या संघाकडून आतापर्यंत अनेक परदेशी खेळाडू क्रिकेट खेळले आहेत. आता त्यामध्ये अजून एकाची भर पडणार आहे. बार्बाडोसमध्ये जन्मलेला अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर इंग्लंडकडून खेळणार आहे. विशेष म्हणजे त्याला पुढील वर्षी होणारा वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका खेळण्याची संधी मिळू शकते. जोफ्रासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्यांच्या पात्रता निकषांमध्ये बदल करणार आहे. इंग्लंडमध्ये न जन्मलेला, मात्र तिथे तीन वर्ष वास्तव्य केलेला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडचे प्रतिनिधित्व करू शकतो, असे नवे निकष तयार करण्यात आले आहेत. पूर्वी परदेशी खेळाडूला इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये किमान 8 वर्ष वास्वव्य पूर्ण करणे गरजेचे होते. जोफ्रा आर्चरला इंग्लंड संघात घेण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलेले नवे बदल पुढील वर्षी 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत. जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत जोफ्राचे इंग्लंडच्या संघाकड पदार्पण होऊ शकते. जोफ्राचे क्रिकेट करिअर जोफ्रा आर्चर हा सध्या 23 वर्षांचा आहे. तो आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय टी-20 लीग खेळला आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याला राजस्थानच्या संघमालकांनी मागील वर्षी 7.2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तो बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येदेखील खेळला आहे. त्याने ऑक्टोबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2015 साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. लंडनमध्ये त्याच्या वास्तव्यास तीन वर्ष पूर्ण होत आहेत.
आणखी वाचा























