एक्स्प्लोर
गेलला मुलगा नाही, मुलगी झाली.. नाव ठेवलं...
मुंबई : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या घरी नवा पाहुणा आल्याची माहिती होती. मात्र गेलला मुलगा नसून मुलगी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेलनेच आपल्याला मुलगा झाल्याचं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं होतं, मात्र त्यानंतर नवीन पोस्टमध्ये त्याने मुलगी असल्याचं स्पष्ट केलं आहे.
गेलने मायदेशी परतताना ‘आय एम ऑन माय वे, बेबी’ असं पोस्ट करुन, आपण घरी येत असल्याची कल्पना फॅन्सना दिली होती. टीममधील सहकारी सरफराजला आपल्याला मुलगा झाल्याची माहिती त्याने दिली होती. हे वृत्त वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरलं. मात्र त्यानंतर काही वेळाने केलेल्या पोस्टमध्ये गेलने तान्हुलीचं स्वागत केलं आणि मुलीचं नाव 'ब्लश' ठेवत असल्याचं जाहीर केलं.
गेलची पार्टनर नताशा बॅरिज बाळंत झाली. तिला आणि नवजात बाळाला पाहण्यासाठी ख्रिस गेल जमैकाला रवाना झाला. त्यामुळे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पुढच्या काही सामन्यांमध्ये ख्रिस गेलशिवायच खेळावं लागणार आहे.
दोन तासांपूर्वी आमच्या विश्वात आलेल्या चिमुकल्या 'ब्लश'चं स्वागत आहे. देवाचे अनंत आभार. कोणालाही आवडेल असं मोठं गिफ्ट आहे हे. ताशा (नताशा) ला शुभेच्छा. ती एक धीरोदात्त महिला आहे, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement