एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियन पत्रकाराला द. आफ्रिकेच्या सुरक्षा रक्षकाची धक्काबुक्की

अॅडलेड : दक्षिण आफ्रिकेकडून लागोपाठ दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या झालेल्या पानिपताच्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन मीडिया आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू झालेला संघर्ष आता धक्काबुक्कीच्या पातळीवर उतरला आहे. अॅडलेड विमानतळावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चॅनेल नाईनच्या प्रतिनिधीला दक्षिण आफ्रिका संघाच्या सुरक्षाधिकाऱ्याने अक्षरश: ढकलून ढकलून दूर ठेवलं. होबार्टच्या दुसऱ्या कसोटीत चेंडू नियमबाह्य पद्धतीने हाताळल्याचा प्लेसीवर आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर तुला अॅडलेडच्या तिसऱ्या कसोटीत खेळू देण्यात येईल, असा प्रश्न प्लेसीला विचारण्याचा प्रयत्न चॅनेल नाईनचा प्रतिनिधी करत होता. दक्षिण आफ्रिका संघाचे सुरक्षाधिकारी जुनैद वादी यांनी प्लेसीला चालत राहण्याची सूचना करून, त्या प्रतिनिधीला धक्का देत देत त्याच्यापासून दूर ठेवलं. जुनैद वादी आणि चॅनेल नाईनचा प्रतिनिधी यांच्यात धक्काबुक्की होण्याची ही दुसरी वेळ आहे. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा























