एक्स्प्लोर
Advertisement
वोडाफोनच्या जाहिरातीत स्मिथच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा वापर
परंतु वोडाफोनच्या या जाहिरातीवर टीकाही होत आहे. तर स्टीव्ह स्मिथने या टीकेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुंबई : 2018 मध्ये बॉल टॅम्परिंगच्या घटनेने क्रिकेटविश्व हादरलं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार, स्टीव्ह स्मिथवर मार्च 2018 पासून एक वर्षासाठी बंदी घातली आहे. पत्रकार परिषद घेऊन स्टीव्ह स्मिथने गुन्ह्याची कबुली देत माफी मागितली होती. त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते. स्मिथच्या त्या अश्रूंनी अनेक जण गहिवरले होते. पण आता तेच अश्रू पुन्हा एका स्क्रीनवर दिसत आहेत. यावेळी स्मिथ कोणतीही पत्रकार परिषद घेत नाही तर त्याच पत्रकार परिषदेचा वापर टेलीकॉम कंपनी वोडाफोन आपल्या जाहिरातीत करत आहे.
स्टीव्ह स्मिथवरील बंदी उठायला आणखी तीन महिने शिल्लक आहे. पण त्याआधी वोडाफोनने स्मिथची एक जाहिरात बनवली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट दोषी ठरले होते. आता स्मिथला त्याच्या कृत्याचा पश्चाताप असल्याचं वोडाफोनच्या या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे.
बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेहून आपल्या घरी येताना स्मिथने जे संभाषण केलं ते जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीची सुरुवात स्मिथ थरथरत्या आवाजात होते, ज्यात तो बॉल टॅम्परिंगच्या गुन्ह्याबाबत माफी मागत आहे.
वोडाफोनने स्मिथच्या परवानगीशिवाय या फूटेजचा वापर केला आहे, असं नाही. तर कंपनीने यासाठी स्मिथला चांगली रक्कमही दिली आहे. स्मिथ ही रक्कम मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला दान करणार आहे, असा दावा ऑस्ट्रेलियातील काही वृत्तपत्रात करण्यात आला आहे.
परंतु वोडाफोनच्या या जाहिरातीवर टीकाही होत आहे. तर स्टीव्ह स्मिथने या टीकेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बॉल टॅम्परिंगनंतर झालेल्या पत्रकार परिषदेनंतर स्मिथने मीडियाशी एकदाही संवाद साधलेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement